देशाची बदनामी करण्यात राऊत आघाडीवर : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका.
Kolhapur
Kolhapursakal

कोल्हापूर : वेगवेगळ्या कारणातून देशाची बदनामी करण्याचे षडयंत्र विरोधकांकडून केले जात आहे. त्यामध्ये खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लसिकरणावरून केलेले आरोप याचाच एक भाग आहे. अशी टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. पक्षाच्या महिला आघाडीतर्फे व्ही.टी.पाटील सभागृहात नारायणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला आज (ता.२५) पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लसिकरणात भारताचा १४४ वा क्रमांक आहे. पंतप्रधान केवळ इव्हेंट करत आहेत. अशी टीका केली होती. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘जगामध्ये १०० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असणारे २ देश आहेत. मग भारताचा क्रमांक १४४ वा कसा? ईडी सारख्या स्वायत्त संस्थांवरही विरोधक विनाकारण टीका करत आहेत. देशाची बदनामी करण्याचे षडयंत्र विरोधकांकडून केले जात आहे. खासदार संजय राऊत त्यामध्ये आघाडीवर आहेत. पृथ्वीराज चव्हण यांची टिका देखील याचाच एक भाग आहे.’ नबाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणावरू तपासयंत्रणांवर आणि अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. याबाबत आमदार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘कोर्ट ज्याला जामीन देत नाही त्याची पाठराखण करण्यासाठी मंत्री नबाब मलिक एखाद्या वकिलाप्रमाणे उभे राहतात. शाहरुख खानही मलिकांप्रमाणे टिका करत नाही.

Kolhapur
पाठोपाठ सुट्ट्या आल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ५ दिवस बंद

घटनेची शपथ घेऊनही न्यायालयाचे निर्णय, तपास यंत्रणा यांच्यावर टिका करणे हा घटनेचा अवमान आहे.’ पेट्रोल-डिझेल दरवाढीवर आमदार पाटील म्हणाले, पेट्रोल-डिझेल जीएसटी मध्ये आणण्यास मंत्री अजित पवार यांचा विरोध आहे. त्यामुळेच इधनाची दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढीवर राज्य सरकारचे मंत्री टीका करतात. मोर्चे काढतात. पण एस.टी.ची दरवाढ झाली तर ते काही बोलत नाहीत. या राज्यात सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.

Kolhapur
पालकमंत्री देसाईंचा दौरा वाऱ्यावरची वरात, तासाभरात नुकसान पाहणी

पुण्याचे पालकमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबद्दल, घडामोडींबद्दल मी बोलणे योग्य नाही. मात्र राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार या वयात पिपंरी चिंचवडच्या नगरसेवकांची बैठक घेत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष घालत आहेत. यावरून महापालिका निवडणुकीत अजित पवार एकटे पुरणार नाहीत असे शरद पवार यांना वाटत असावे. असे दिसते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com