बेळगाव : २०१८ नंतर पहिल्यांदाच विधीमंडळ अधिवेशन होणार

विधीमंडळ अधिवेशनाची २० नोव्हेंबरपर्यंत पूर्वतयारी पूर्ण करण्याच्या सूचना

बेळगाव : २०१८ नंतर पहिल्यांदाच विधीमंडळ अधिवेशन होणार
बेळगाव : २०१८ नंतर पहिल्यांदाच विधीमंडळ अधिवेशन होणार sakal

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव, ता.८ ः बेळगावात डिसेंबरला होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनाची २० नोव्हेंबरपर्यंत पूर्वतयारी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी सोमवारी (ता.८) दिली.

सभापती होरट्टी यांनी पहिल्यांदा अधिकाऱ्यांची बैठक व विधानपरिषद सभागृहाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदाच्या विधीमंडळाचे वैशिष्ठ्य म्हणजे विधीमंडळाचे थेट प्रेक्षपण करण्याची तयारी आहे, या उद्देशाने वेबकास्टची व्यवस्था केली जात आहे. त्याची जबाबदारी ई-गव्हर्नन्स, सार्वजनिक आणि बांधकाम खाते आणि माहिती आणि प्रसिध्दी खात्याकडे असून, अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सूचना बजाविल्या आहेत. अधिवेशनाची पूर्वतयारी २० नोव्हेंबरपर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. बेळगावला २०१८ नंतर विधीमंडळ अधिवेशन होणार आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली व व्यवस्थित असल्यामुळे निर्णय झाला आहे. नियोजित अधिवेशनामध्ये अधिकाधिक आमदारांनी सहभागी व्हावे, त्यासाठी प्रयत्नशिल आहे. विधीमंडळ अधिवेशान सत्र सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व पावले उचलली आहेत. अधिवेशन बेळगावला व डिसेंबर महिन्यांत होणार आहे. त्याबाबतची तारीख अजून ठरली नाही. सरकारच्या पातळीवर घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले आहे.


बेळगाव : २०१८ नंतर पहिल्यांदाच विधीमंडळ अधिवेशन होणार
शासनाचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना अमान्य; संप सुरुच राहणार!

सभापती होरट्टी पुढे म्हणाले,‘‘सुवर्णसौध परिसरात आमदार भवन निर्मीतीची मागणी जनतेची आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सरकारचे त्याकडे लक्ष वेधले जाईल. आमदार भवनबाबत साधकबाधक चर्चा करून योग्य कार्यवाही केली जाईल. बेळगावात दरवर्षी हिवाळी अधिवेशन घेण्याचे नियोजन असल्यामुळे सुवर्णमध्ये आमदार भवन बांधणे योग्य ठरेल, असे माझे मत आहे. विधीमंडळ अधिवेशन दरम्यान नियमितचे कामकाज सुरळीत चालावे, त्यासाठी आढावा घेण्यात येईल. सुवर्णसौधला विविध विभागांची राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित करणे योग्य ठरेल. अधिवेशनासाठी आवश्‍यक सर्व तयारी केली जावी. कोणत्याही उणिवा राहणार नाहीत, याची दखल अधिकाऱ्यांना घेण्याबाबत बैठकीत सूचना केल्या आहेत. आमदारांची उपस्थिती अनिवार्य करण्याची तरतूद नाही. पण बेळगावातील अधिवेशनात आमदारांचा सहभाग अपेक्षित आहे. प्रश्‍नोत्तर, शून्यवेळ, लक्षवेधी प्रश्‍न आदींसह अन्य विषय त्या त्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. उत्तर कर्नाटकातील प्रश्नांवर अधिवेशनात चर्चेला प्राधान्य दिले जाईल.’’ यावेळी विधानपरिषद सचिव महालक्ष्मी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com