बेळगाव : पांगिरेच्या बालाजीची कोरियास भरारी

ग्रामीण तरुणांसमोर आदर्श : इंधनावर करतोय संशोधन
बालाजी साळोखे
बालाजी साळोखेsakal

निपाणी : आपले गाव आणि महाविद्यालयाची शान वाढवत बालाजीनं संशोधन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याचा ध्यास घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. योग्य मार्गदर्शन, दिशा आणि संधी मिळाल्यास जिद्द व कष्टाच्या बळावर सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतील तरुणही संशोधन क्षेत्रात मौलिक कामगिरी करू शकतात, हे त्यानं स्वतःच्या कर्तृत्वातून अल्पावधीत दाखवून दिलं आहे. तो आता शिष्यवृत्तीच्या आधारावर इंधनावर संशोधनासाठी (गुरुवारी ता. १७) कोरियाला जात आहे. त्याच्या या भरारीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

बालाजी साळोखे
गोडसाखर चालवा, मी बाहेर पडतो ; श्रीपतराव शिंदे

अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात संशोधक म्हणून अभ्यास करणा-या बालाजी शिवाजी साळोखे या विद्यार्थ्याने तेथेच फिजिक्समधून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुळचा तो पांगिरे (ता. भुदरगड) येथील दुर्गम खेड्यातील. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. मिलिटरी शिस्तीच्या वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी पेठवडगावच्या आदर्श गुरुकुलमध्ये बोर्डिंगला ठेवले. उच्च माध्यमिकसाठी पुण्याच्या एस. पी. ला गेला आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी देवचंद काॅलेजमध्ये आला. तेथे एनसीसी, एनएसएसबरोबरच सांस्कृतिक व कलाक्षेत्रात नावाजला. मात्र प्रा. डॉ. किशोर गुरव यांनी त्याच्यातील संशोधनाचे गुण हेरून त्यात करिअरसाठी क्षमता वाढविण्याचा मंत्र व दिशा दिली. पुढे देवचंद काॅलेजच्या प्रयोगशाळेत दिवसातील १०-१४ तास अभ्यास करून त्याने बघता बघता आंतरराष्ट्रीय दर्जाचे सात शोधनिबंध सादर केले. आता दक्षिण कोरियातील जुआंजु सिटी शहरातील चोनबुक युनिव्हर्सिटीत प्रा. डॉ. जे. एच. ली. यांच्या मार्गदर्शनाखाली तो "एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस"मध्ये इंधनाच्या हानीविरहित नैसर्गिक वापरावर संशोधन करणार आहे. या संशोधनाला आंतरराष्ट्रीय परिमाण आहे.

बालाजी साळोखे
मनपा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर ; अरुण दुधवडकर

मला संशोधनाकडे वळविण्यासाठी प्रा. डॉ. किशोर गुरव यांनीच खरी प्रेरणा दिली. तसेच कुटुंबीयांचे पाठबळ लाभल्याने परदेशात जावून संशोधनाची संधी मिळाली. त्यातून देशसेवेत खारीचा वाटा उचलणार आहोत. ग्रामीण तरुणांसाठी परिसरातच रोजगार व त्यांना संशोधन क्षेत्रासाठी दिशा देणे यासाठी प्रयत्न राहतील.

बालाजी साळोखे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com