Belgaum : फरारी गुंड विशाल चव्हाणवर पोलिसांचा गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Crime News

कुख्यात गुंड विशाल सिंग रजपूतचा पाठलाग करून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केलाय.

Belgaum : फरारी गुंड विशाल चव्हाणवर पोलिसांचा गोळीबार

बेळगाव : भवानीनगर येथील बांधकाम व्यावसायिक राजू दोड्डबोन्नावर यांचा खून करून फरारी झालेला कुख्यात गुंड सुपारी किलर विशाल चव्हाणचा पाठलाग करून पोलिसांनी (Belgaum Police) त्याच्यावर गोळीबार केलाय.

आज, मंगळवार (ता. २१) सकाळी वीरभद्रनगर इथं ही घटना घडली असून त्यानं पळून जाण्याच्या प्रयत्नात एका पोलिसांवर हल्ला केल्यानं प्रत्युत्तरादाखल सहपोलीस आयुक्त नारायण बरमणी यांनी त्याच्या पायावर गोळीबार करून त्याच्या मुसक्या आवळल्या. सध्या त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.