esakal | भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

बोलून बातमी शोधा

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे.

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

अध्यक्षपदाची चुरस 

भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार 

खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. 

डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित 

माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.