Sangli DCC Bank - 'महाडिक गट, विषय कट'; वाळवा तालुक्यात जयंत पाटलांना धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाळवा

वाळवा तालुक्यात महाडिक गटाला उभारी मिळाली असून जिल्हा बँकेत प्रथमच महाडिकांचा आवाज घुमणार

'महाडिक गट, विषय कट'; वाळवा तालुक्यात जयंत पाटलांना धक्का

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी बँका-पतसंस्था गटातून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला. (Sangli District Bank Election) राहुल महाडिक यांच्या रुपाने महाडिक कुटुंबातील पहिल्या सदस्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला आहे. (DCC Bank Election) महाडिक यांचा विजय पालकमंत्री जयंत पाटील यांना धक्का देणारा असून महाडिक गटाला उर्जा देणारा ठरला. (Sangli District Bank Election) महाडिकांच्या विजयाने इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात जल्लोष करण्यात आला. (Sangli DCC bank election 2021 result)

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीकडून भाजपला डावलत पॅनेल तयार करण्यात आले होते. या निवडणूकीत वाळवा तालुक्यातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, ॲड. चिमण डांगे, वैभव शिंदे, राहुल महाडिक, सी. बी. पाटील, भानूदास मोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोसायटी गटात राष्ट्रवादीकडून एकतर्फी लढत होती. तर बँका, पतसंस्था गटातून राहुल महाडिक यांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल केलेल्या दिवसापासूनच महाडिक समर्थकांनी 'महाडिक गट विषय कट' असे म्हणत राहुल महाडिक निश्चित विजयी होतील, असा दावा केला होता.

हेही वाचा: सांगली जिल्हा बँकेवर महाआघाडीची सत्ता; भाजपचा गुलाल 4 जागांवर

महाडिक यांनी बँका-पतसंस्था गटातजिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील मतदारांच्या बरोबर वैयक्तीक पातळीवर संपर्क साधून प्रचाराचे रान उठवले होते. परफेक्ट प्लॅनिंग करत पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे बंधू राष्ट्रवादीच्या किरण लाड यांना पराभूत करत महाडिक यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. वास्तविक बँका-पतसंस्था गटात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांचे एकतर्फी वर्चस्व असूनही महाडिक यांनी आपल्या जिल्हाभर पसरलेले कार्यकर्ते व वैयक्तीक संपर्काच्या जोरावर ही निवडणूक जिंकली.

या निवडणूकीमुळे वाळवा तालुक्यात महाडिक गटाला उभारी मिळाली असून जिल्हा बँकेत प्रथमच महाडिकांचा आवाज घुमणार आहे. राहुल महाडिक यांच्या विजयासाठी त्यांचे बंधू सम्राट महाडिक, इस्लामपूरचे माजी नगरसेवक कपील ओसवाल, नगरसेवक अमीत ओसवाल यांनी परिश्रम घेतले. तर या निवडणूकीमुळे तोंडावर असलेल्या जिल्हा परिषद व इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणूकीत महाडिक गट राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवणार असे म्हणावे लागेल.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

loading image
go to top