
बॉडी बिल्डिंगचा नाद न्यारा, नका करू स्टेरॉईडचा मारा!
निपाणी : पिळदार शरीरयष्टी कमविण्यासाठी निपाणीसह चिक्कोडी तालुक्यातील अनेक युवक जिममध्ये जाऊन घाम गाळत आहेत. परंतु कमी वेळेत, कमी कष्टात बॉडी बनविण्याच्या प्रयत्नात अनेक मुले स्टेराईडकडे वळण्याचा धोका आहे. परंतु स्टेरॉईडचे प्रमाणाबाहेर सेवन किडन्यांसह शरीराच्या विविध अवयवांवर गंभीर परिणाम करणारे ठरते, असा सल्ला वैद्यकीय मंडळीकडून दिला जात आहे.
हेही वाचा: ..तर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आंदोलन
हिवाळा चालू झाला आहे. त्यामुळे तरुणाई सकाळ-सायंकाळच्या सुमारास मैदानावर सराव करताना दिसून येत आहे. निपाणी शहरात पाच जिम आहेत. तालुक्यातील जिमही फुल्ल झाल्याचे चित्र आहे. उत्तम शरीरयष्टी बनविण्यासाठी तरुणांची धडपड सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र काही युवक बॉडी बिल्डिंगच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टींकडे वळण्याची शक्यता असते. झटपट बॉडी बनविण्यासाठी आजकालची तरुणाई स्टेरॉईडच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र आहे. खरे तर स्टेरॉईड हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे अपेक्षित असते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत तरुणाई स्टेरॉईडच्या विळख्यात फसत आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकारच्या व्यायाम व जिममधून तसेच क्रीडा कौशल्याचा आधार घेतही बॉडी बनविता येते. बनविलेली नैसर्गिकदृष्ट्या शरीरयष्टीच उत्तमरित्या टिकून राहात असल्याचेही सांगितले जाते.
हेही वाचा: या एका मुद्द्यावर राष्ट्रपती राजवट लागू शकते - चंद्रकांत पाटील
सिक्स पॅकसाठी अतिरेक नको
जिम जॉईन केल्यानंतर अनेकांना महिनाभरातच फरक हवा असतो. परंतु सिक्स पॅकसाठी अतिरेक करणे धोकादायक असते. जिममध्ये ट्रेनर असतात. ट्रेनरच्या सल्ल्यानुसारच प्रत्येक व्यायाम करणे गरजेचे आहे. ट्रेनरने दिलेला वेळ आणि सांगितलेले प्रकारही व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
अशी घ्या काळजी...
व्यायामासाठी जिम जॉईन करताना जेथे ट्रेनर आहे, तेथेच जिम जॉईन करणे गरजेचे आहे. ट्रेनरने सांगितल्याशिवाय जिममधील साहित्याचा वापर करून अतिरेकी व्यायाम टाळावा. सिक्सपॅक तयार करण्याच्या प्रयत्नात स्टेराईडसह इतर औषधांचे सेवन करून नये. सदृढ शरीर तयार करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने व्यायाम करावा. वर्षानुवर्षे सरावानंतर शरीर नक्की सुदृढ बनेल.
हेही वाचा: सावध व्हा! ओमीक्रॉन बाधितांची संख्या वाढली, केरळमध्ये आणखी ९ जण
'स्टेराईडमुळे बी. पी., शुगर वाढणे, हाडे ठिसूळ होणे, शारीरिक कमजोरी निर्माण होण्याची शक्यता असते. कोणी स्टेराईडचा वापर करीत असेल तर तो अजिबात करू नये. हे शरीरासाठी हानीकारकच आहे. त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येतात'
-डॉ. महेश ऐनापुरे, निपाणी
'आरोग्य धस्टपुष्ट बनवण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे. मात्र काही तरुण शरीर कमविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत आहेत ते चुकीचे आहे. प्रोटीन मिळणारे चिकन, पनीरचा जेवणामध्ये वापर करणे आवश्यक आहे. याशिवाय नियमित व्यायाम केल्यास आरोग्य कमविता येते.'
-कुंदन पाटील, संचालक, हॅबीट फिटनेस, निपाणी
Web Title: Body Building No Steroid Dose
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..