कृष्णेच्या मायेचा झरा इस्लामपुरात ; तीन ट्रॉल्या भाजीचे मोफत वाटप

borgaon village people help islampur city people corona virus
borgaon village people help islampur city people corona virus

नवेखेड : बोरगाव (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांनी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या इस्लामपूरवासियांना तीन ट्रॉल्या भाजीपाला व तीस क्विंटल साखरेचे वाटप करून मायेचा ओलावा जपला. 

इस्लामपूर शहरात कोरोनाचे 25 रुग्ण सापडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यामुळे इस्लामपूर शहरात गेले आठवडाभर लॉकडाऊन कडक करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला पर्याय म्हणून दातृत्वाचे अनेक हात पुढे आले आहेत. इस्लामपूर शहरापासून अवघ्या सात-आठ किलोमीटरवर असलेल्या बोरगाव ग्रामस्थांनी इस्लामपूरवासीयांची अडचण लक्षात घेऊन कृष्णा काठावरील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला दिवसभर फिरून एकत्रित केला. अन्य काही वस्तू शेतकऱ्याच्याकडून आणल्या. ज्यांच्याकडे भाजीपाला उपलब्ध नाही अशा ग्रामस्थांनी रोख रक्कम दिली. त्यातून 30 क्विंटल साखर खरेदी करून त्याचेही वाटप इस्लामपूर वासियांना केले.

भाऊ भावाच्या मदतीला धावून यावा याप्रमाणे ग्रामस्थांनी याचे नियोजन केले. आठ नऊ  महिन्यापूर्वी महापुराने कृष्णा काठावर हाहाकार उडाला होता. गावातून बाहेर पडायचा एकमेव मार्ग म्हणचे इस्लामपूर शहराकडे जाणारा मार्ग. त्याच मार्गाने हजारो कृष्णा काठावरील ग्रामस्थ  इस्लामपूर येथे दाखल झाले. इस्लामपूरकरांनी त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था पार पाडली होती. आता कोरोनाव्हायरसचे संकट आल्याने इस्लामपूर शहर राज्यभर चर्चेत आले. शहरवासियांना धीर देत रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा बोरगाव ग्रामस्थांनी केला. आता पुढील टप्प्यात एक दिवसचे दूध संकलन करून ते इस्लामपुरात वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावात असणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांकडून अंडी एकत्र करून त्याचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हापरिषद सदस्य जितेंद्र पाटील, उपसरपंच सूर्यकांत पाटील, माजी उपसरपंच प्रमोद शिंदे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रणधीर पाटील, हेमंत पाटील, संतोष पाटील, सचिन डांगे, कृष्णकुमार वाटेगावकर, मालोजी पाटील, दीपक पाटील यांनी परिश्रम घेत ही मोहीम राबवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com