esakal | लोकसभा पोटनिवडणुकीत दिव्यांगांनी साधली किमया, 'ब्रेल लिपी'ने बजावला मतदानाचा हक्क

बोलून बातमी शोधा

Braille Ballot
लोकसभा पोटनिवडणुकीत दिव्यांगांनी साधली किमया, 'ब्रेल लिपी'ने बजावला मतदानाचा हक्क
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : आपण डोळस असल्याने मतदान करताना योग्य ते बटन दाबून मतदानाचा अधिकार बजावतो. मात्र, जे जन्माने अंध असतात किंवा ज्यांची दृष्टी जाते ते बांधव कसे मतदान करतात हा अनेकांपुढे प्रश्न असतो. मात्र, जे अंध आहेत त्यांची स्वतःची एक लिपी असते. त्याला ब्रेल लिपी म्हणतात. त्या ब्रेल लिपीच्या सहाय्याने ते मतदानाचा अधिकार बजावतात. बेळगावात लोकसभा निवडणुकीवेळी माहेश्वरी अंध शाळा व अन्य काही अंध विद्यार्थ्यांचा आधार घेऊन अंधांसाठी मतपत्रिका बनविण्यात आली होती.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान झाले. याचा 2 मे रोजी निकाल आहे. देशातील प्रत्‍येकाला मतदानाचा सारखाच अधिकार आहे हा विचार रुजविण्‍यासाठी, आपण इतरांपेक्षा वेगळे नाही ही भावना प्रत्‍येक अंध मतदारांमध्‍ये वाढविण्याच्या दृष्‍टीने निवडणूक विभागाकडून प्रत्येक निवडणुकीत प्रयत्न केले जातात. यावेळीही प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी निवडणूक आयोगाने जागृती केली.

कर्नाटकात मराठी भाषिकांवर जुलमी अन्याय; 'सीमाप्रश्नी' महाराष्ट्राची भूमिका ठरणार महत्वाची!

बेळगाव लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात अंध मतदार आहेत. त्या मतदारांना निवडणुकीत सामील करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले. अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपीतील व चिन्‍हांकीत मतपत्रिका काढण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार त्यांची चिन्हे अंधांना समजण्यासाठी ब्रेल लिपीच्या साह्याने जिल्हा प्रशासनाने एक मतपत्रिका बनवून घेतली होती. ती मतपत्रिका प्रत्येक अंधांच्या घरी जाऊन जागृती करण्यात आली. ही मतपत्रिका बनविण्याचे काम यावेळी माहेश्वरी अंध शाळेचे विद्यार्थी, शंकर मुतकेकर जिनापा तकाळी, एस. एम रावळ, समन्वयक ब्लाइंड फाउंडेशन यांनी केले.

VIDEO : नगरसेवकांचं असंही दातृत्व; 'विलगीकरणा'साठी दिलं मोफत हॉटेल, जेवणाचीही केली सोय

मतदान यंत्रावर अंध व्यक्तींना समजण्यासाठी एका बाजूला ब्रेल लिपीमध्ये स्टिकर चिकटविण्यात आलेली असतात. त्यातून त्यांना क्रमांक व उमेदवाराचे चिन्ह अधोरेखित होते. त्या चिन्हाला हात धरून अंदाजे ते मतदान करतात. अनेकजण शाळेत जात नाहीत त्यांना ब्रेल लिपीची भाषाही कळत नाही. त्यामुळे त्यांना अडचणी येतात. अशावेळी इतरांचे सहकार्य घेऊन त्यांना मतदानाचा अधिकार दिला जातो. आपण जसे डोळ्याने वाचतो तसे अंध व्यक्ती बोटाने वाचतात. जिल्हा प्रशासनाकडून 250 मत पत्रिका काढण्याचे काम शंकर मुतकेकर व सहकार्यांना देण्यात आले होते. त्यांनी ते काम माहेश्वरी अंध शाळेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अवघ्या चार दिवसात करून दिले.

जीवावर उदार होऊन कोविड योद्ध्यांची रुग्णसेवा, सबंध महाराष्ट्राला 'आरोग्य'चाच हेवा!

डोळस व्यक्ती जशी डोळ्याने वाचते. तसे अंध व्यक्ती बोटाने वाचते. अंध व्यक्तींना ब्रेल लिपीचा फायदा होतो. लोकसभा निवडणुकीवेळी दोनशे पन्नास मतपत्रिका करण्याचे काम आम्हाला देण्यात आले होते. ते आम्ही चार दिवसात केले. याचा अनेक अंध व्यक्तींना फायदा झाला.

-शंकर मुतकेकर, अंध शिक्षक

Edited By : Balkrishna Madhale