

One Dead 13 Injured as Bullock Carts Run Into Crowd at Sangli Race
Esakal
Bullock Cart Race: सांगलीत बोरगाव इथं रविवारी सर्वात मोठ्या अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी श्रीनाथ केसरी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेक फेल या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकाचं फॉर्च्युनरचं बक्षीस पटकावलं. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यात बैल उधळल्यानं चेंगराचेंगरीत एका वृद्धाचा मृत्यू झालाय तर १३ जण जखमी झाले आहेत.