
वायव्य परिवहन मंडळाने बस तिकीट दरात वाढ केली असून गुरुवारी (ता. 26) सकाळपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
बेळगाव - वायव्य परिवहन मंडळाने बस तिकीट दरात वाढ केली असून गुरुवारी (ता. 26) सकाळपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंडळाने जरी 12 टक्के दरवाढ केली असली तरी शहर व ग्रामीण भागातील बस तिकीट दरात तफावत असून प्रतिस्टेज सरासरी 1 रुपयाप्रमाणे वाढ केली आहे. मात्र, पुणे, मुंबई, कोल्हापूर, बंगळूर प्रवासाचा दर वाढला आहे. गेल्या सहा वर्षांत मंडळाने दरवाढ केली नव्हती. मात्र, शासनाने अचानक निर्णय घेत बसदर वाढविले आहेत.
हे पण वाचा - बेळगावातील बेरोजगारांना रोजगाराची सुवर्ण संधी; येथे मिळणार रोजगार
शेवटची बस तिकीट दरवाढ 2014 मध्ये झाली होती. त्यानंतर डिझेल दरात वाढ होऊनही बसप्रवास महागला नव्हता. गतवर्षी कॉंग्रेस-धजद युती सरकारने तिकीट दरात वाढ केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ही दरवाढ रद्द केली होती. त्यामुळे, दरवाढ थांबली होती. परिवहन मंडळांचा प्रस्ताव तसेच सहा वर्षांत दरवाढ न झाल्याचा विचार करुन अखेर दरवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र डिझेल दरवाढ आणि कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन यामुळे परिवहन मंडळ आर्थिक नुकसानीत आहे. त्यामुळे, सरकारला दरवाढ करावी लागली आहे.
हे पण वाचा - त्यावेळी मीच तुमचा मंत्री होतो... शरद पवार यांनी जागविल्या त्या आठवणी
शहर व ग्रामीण भागातील बस तिकीट दरात सरासरी 1 ते 2 रुपयांची वाढ केली आहे. पहिल्या स्टेजचा दर बदललेला नाही. त्यामुळे, पहिल्या तीन किलोमीटरसाठी 5 रुपये आकारणी होणार आहे. सीबीटीपासून कोर्ट, गांधीनगर अशा ठिकाणी पहिल्या स्टेजचे दर 5 रुपयेच राहतील. मात्र, त्यापुढील स्टेजसाठी थेट 2 रुपयांची वाढ केली आहे. सीबीटीपासून रेक्स, आरएलएस, धर्मवीर संभाजी चौकापर्यंतचा जुना दर 8 रुपये होता. त्यात दोन रुपये वाढ होणार असून 10 रुपये मोजावे लागतील.
शहर, ग्रामीण भागातील नवे दर
स्टेज प्रौढ लहान मुले
1 5 3
2 10 5
3 12 6
4 14 7
5 15 8
6 16 8
7 17 9
8 ते 10 18 9
11 ते 13 19 10
14 ते 17 20 10
18 ते 20 21 11
लांब पल्ल्यांसाठी नवे दर
शहर दर
कोल्हापूर 139
पुणे 411 ते 466
मुंबई 716 ते 871
म्हैसूर 558
बंगळूर 564