मुलीच्या शिक्षणासाठी सोडलं गाव; अन्‌ ती झाली सीए

Jyoti Raut
Jyoti Raut

माढा (सोलापूर) : सरपंचपदाची जबाबदारी सांभाळत माढा गावचा कारभार पाहणाऱ्या माजी सरपंच पती- पत्नीने मुलीच्या शिक्षण व करिअरसाठी गाव‌ सोडलं, अन् तिनेही जिद्द ठेवत यश मिळवले आहे. माढ्यातील शेतकरी कुटुंबातील माजी सरपंच राजेंद्र राऊत व सुनिता राऊत यांची मुलगी ज्योती राऊत हिने सी. ए. परीक्षेत यश मिळवून माढ्यातील पहिली महिला चार्टड अकौंटंट होण्याचा मान मिळवला आहे.‌

हेही वाचा- सोलापूर जिल्ह्यातील या गावात सापडले ‘वीरगळ’
ज्योतील २११ गुण

१६ जानेवारीला जाहीर झालेल्या अंतिम परीक्षेच्या निकालात ज्योती राऊत हिने २११ गुण मिळवले आहेत. राज्यात ३५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी दिलेल्या या परीक्षेचा केवळ २३ टक्के लागला आहे. ज्योतीचे शिक्षण माढ्यातील जिल्हा परिषद प्रशालेत माध्यमिक तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन पुण्यातील गरवारे महाविद्यालय व सिंहगड इन्टिट्यूटमध्ये झाले. मुलीच्या दहावीच्या शिक्षणानंतर वडील राजेंद्र राऊत यांनी शिक्षणासाठी माढा सोडले आणि पुण्यामध्ये मिळेल तो व्यवसाय करून अत्यंत खडतर परिस्थितीतून मुलीला शिक्षण दिले. राजेंद्र राऊत व सूनिता राऊत हे दोघे पती- पत्नीने माढयाचे सरपंचपद भूषविले होते. 

माढ्यातील आपली राजकीय कारकीर्द या दोघांनी सोडली. माढ्यात जमीन, जागा घर सगळे आहे. राजकारणातही चांगले बस्तान बसले होते. मात्र मुलीच्या शिक्षणापुढे सगळ्याच गोष्टींचा त्याग केला अन् या पती पत्नीने थेट पुणे गाठले. पुण्यामध्ये मिळेल ते काम करत संघर्ष करत मुलीला सीए करण्याची खुनगाठ या पती पत्नीने बांधली. आपल्या आई वडिलांनाच्या कष्टाचे चीज करण्याची जिद्द ज्योतीने मनात बाळगली आणि सीएच्या परीक्षेचा जोरदार अभ्यास सुरू केला. मनात आई वडिलांच्या कष्टाचे आणि मोठ्या त्यागाचे फळ त्यांना मिळवून देण्याचा ठाम निर्धार केलेल्या ज्योतीने सीएच्या परीक्षेची जोरदार तयारी करत यश संपादन केले. ज्योतीस चार्टड अकौंटंट के. एस. माळी, रामेश्वर मुंढे, वर्धमान शहा, प्रकाश पटवर्धन यांच्यासह शिक्षक जी. व्ही. कापरे, संतोष कुलकर्णी, विठ्ठल गायकवाड, प्रा. अर्जून अनभुले, सारिका होळे, धनंजय होळे व आजी लक्ष्मी क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल माढ्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे, माजी उपसरपंच राजेंद्र चवरे, महात्मा फुले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ माळी, डॉ. हनुमंत क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

संयम ठेऊन प्रयत्न
जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कोणतेही कठीण काम यशस्वी करता येते. आई वडिलांनी बाळगलेले स्वप्न पूर्ण करता आले.  माझ्या आई व डिलांची अपार मेहनत पाहून मी जिद्दीने अभ्यास केल्याने यशस्वी झाले. विविध क्षेत्रात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे व सयंम ठेवून प्रयत्न करावेत.
- ज्योती राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com