नोकरीचे आमिष; साडेपाच लाखांची फसवणूक

Money
Money
Updated on

सातारा : सारस्वत बॅंकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून तिघांनी साडेपाच लाखांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उजेडात आली. या प्रकरणी माजी सैनिक विलास किसन जाधव (वय 56, रा. करंडी ता. सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विलास जाधव हे भारतीय सैन्य दलातून जानेवारी 2008 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीची रक्कम स्टेट बॅंकेत ठेवली होती. त्यांचा मुलगा रोहित (वय 25) हा नोकरीसाठी प्रयत्न करत होता. त्यांच्या गावातील दादा पिलावरे यांचा पुतण्या विशाल पिलावरे (वय 45) याची जाधव यांच्याशी ओळख होती. त्याला सेवानिवृत्तीची रक्कम मिळाल्याबाबतची माहीत होती. 

फेब्रुवारी 2013 मध्ये जाधव घरी असताना पिलावरे याने मला फोन करुन "तुमचा मुलगा 12 वी पास झाला आहे. त्यास सारस्वत बॅंकेत पाच लाख 50 हजार रुपये देवुन नोकरी लावतो. आपलेकडे तशी पार्टी आहे,' असे सांगितले. त्यावेळी त्यास नकार दिला. तो वारंवार जाधव दाम्पत्यास फोन करुन तुमच्या मुलास चांगल्या पदावर नोकरी लावतो, असे म्हणत असल्यामुळे दोघांनी पैसे देण्याचे ठरवले. त्यानुसार पिलावरे याने फोन करुन राजवाडा येथील राजधानी टॉवर्स येथे बोलावले. जाधव व रोहित दोघे तेथे गेले असता पुढील पार्टीस भेटण्यास जावूया, असे म्हणून त्याच्याकडील फोर व्हीलर नंबर 6666 (पूर्ण नंबर माहित नाही) या गाडीतून नगरपालिका शॉपिंग सेंटरजवळील अजिंक्‍य हॉटेलमध्ये नेले. तेथे मंत्रालयात कामाला असतात, अशी प्रसाद धोत्रे यांची करून ओळख दिली. रोहित यांची कागदपत्रे धोत्रेला दाखविली. यापूर्वी चार ते पाच जणांची कामे केली असून, तुमच्या मुलाचे काम करायचे असल्यास पाच लाख 50 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. 

पैसे भरण्यासाठी घरातील व भावाकडील सोन्याचे दागिने गहाण ठेवले व  जाधवांनी भाच्याकडून एक लाख, चुलत भावाकडून एक लाख असे उसणे पैसे घेवून साडेपाच लाखांची जुळणी केली. ते पैसे राजधानी टॉवर्स येथे देण्यास गेलो. यावेळी रोहीत, मेहुणा सयाजी शिवाजी पवार, भाचा भरत विनायक घोरपडे, चुलत भाऊ बाळकृष्ण दत्तात्रय जाधव, सूर्याजी गणपत जाधव हेही आले होते. तेव्हा मोळाचा ओढा येथे धोत्रेच्या घरी पैसे देण्यास नेले. 


नोकरीचे काम दोन महिन्यात होईल, असे धोत्रेने सांगत नाही झाले तर आताच आयसीआयसीआय बॅंकेचा चेक देतो, असे सांगून धनादेश दिला. दोन महिन्यानंतर विशाल, प्रसाद यांना फोन करून कामाबाबत विचारले. त्यांनी शासनाची कामे चालू आहेत. यादी यायला वेळ लागेल, असे बोलून फोन ठेवत होते. त्यानंतर प्रसाद धोत्रेशी संपर्क केला असता त्यानी फोन बंद करून ठेवला होता. त्यावर विशालने नोकरी नाही लागली तर तुमचे व्याजासह पैसे देईन, असे सांगितले. मात्र, पुन्हा पिलावरे याने फोन उचलण्यास व भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. भेट घेतल्यानंतर पंधरा दिवसांत पैसे देतो, असे सांगितले. 

त्यावेळी विशालने प्रसाद धोत्रे यांनी त्याचे मित्र गायकवाड याला नोकरी देण्याकरीता फोनवर चर्चा केली होती. त्याचे घर तुम्हाला मी दाखवतो असे म्हणून गायकवाड यांच्या न्यू इंग्लीश स्कूलजवळील घरी नेले. त्यानंतर गायकवाड यांनी मी व विशाल अडीच-अडीच लाख रूपये देतो असे सांगितले. मात्र, दोघांनीही पैसे दिले नाहीत. या प्रकरणी तिघांवर नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com