आठवड्यात दोन हजार लोकांचा कर्नाटकात प्रवेश; सीमा नाक्यावर बंदोबस्त कडक

बंदोबस्तसाठी पन्नास कर्मचाऱ्यांची नेमणूक
आठवड्यात दोन हजार लोकांचा कर्नाटकात प्रवेश; सीमा नाक्यावर बंदोबस्त कडक

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर (national highway) असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन (check post) आठवड्यात सुमारे दोन हजार लोकांनी महाराष्ट्र (maharashtra) व इतर राज्यांतून कर्नाटकात (karnatak) प्रवेश केला आहे. या ठिकाणी पोलिस (belgaum police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथे विविध खात्यातील 50 अधिकारी कार्यरत आहेत.

महाराष्ट्र व इतर राज्यात कोरोना (covid-19 patients)रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने (karnatak government) तीन महिन्यांहून अधिक काळ या ठिकाणी सीमा तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना 72 तासाच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट (RTPCR report) पाहून कर्नाटकात प्रवेश देण्यात येत आहे. महाराष्ट्रातून व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांकडे रिपोर्ट नसणारे शेकडो वाहने या ठिकाणाहून परत पाठविण्यात आली आहेत.

आठवड्यात दोन हजार लोकांचा कर्नाटकात प्रवेश; सीमा नाक्यावर बंदोबस्त कडक
'ठाकरे सरकारसह मंत्र्यांना लपायला जागा मिळणार नाही'

महाराष्ट्रसह इतर राज्यातून येणाऱ्या चारचाकी वाहनधारकांची अधिकारी वर्गाकडून (officers) तपासणी केली जाते. मालवाहू व इतर वाहने तपासली जात नाहीत. सीमा तपासणी नाक्यावर पोलिस, महसूल विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तीन शिफ्टमध्ये बंदोबस्त सुरु आहे.

चिकोडीचे डीवायएसपी मनोजकुमार नायक, मंडल पोलिस निरीक्षक एस. आय. गुरुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह तीस पोलिस या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. चिक्कोडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी सलीम मुजावर व आशा स्वयंसेविका काम पाहत आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने ए. आर. बडगेर, के. ए. चिंचवाडे, सी टी. सुतार, मांगूरमधील आशा रुक्मिणी कमते, नकुशा तराळ, मेघा कोगनोळे, हेमा गोरे यांच्यासह कर्मचारी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com