
Raju Shetty
sakal
इस्लामपूर (जिल्हा सांगली) - सरकारकडून बेकायदेशीर कपाती सुरू आहेत. साखर कारखान्यांमध्ये एआय तंत्रज्ञान आणण्याला आमचा विरोध नाही; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिकवरी चोरी आणि काटामारी यातही लक्ष घालावे. ५०० टनांपेक्षा जास्त ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, म्हणजे काळा पैसा आणि गैरव्यवहार बाहेर येईल, असे आव्हान माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज येथे दिले.