कॉंग्रेसचा 'हा' नेता का आला हाेता साताऱ्यात ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता काॅंग्रेसच्या नेत्याचे सातारामध्ये येणे जनतेच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय ठरली आहे.

सातारा : कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जागतिक वारसास्थळ असलेल्या 'कास'ला आपल्या मित्र परिवारासह सोमवारी (ता.19) आले होते. यावेळी त्यांनी या परिसरातील यवतेश्वर परिसर, कास परिसरात फेरफटका मारत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.
 
श्री. शिंदे यांना कास व परिसर भावला. एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, " कास पुष्प पठार हा इतका निसर्गरम्य आहे, असे वाटले नव्हते. मी पहिल्यांदाच कासला आलो आहे. येथील पुष्प पठाराने मी मोहित झालो आहे." 

हेही वाचा : राजेंना जे शक्य हाेते ते पाटलांनी करुन दाखवलं

सातारा आणि महाबळेश्वर ही दोन शहरे निसर्गाची देन आहेत. राजकीय, पूर्वकालीन परिस्थिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्यात राहतात त्यामुळे या शहराला वेगळे महत्व आहे. कास परिसराच्या दोन्ही बाजूला धरणे आहेत. असे विहंगम दृश्‍य कोठेही पहावयास मिळणे अशक्‍य असल्याचे मतही शिंदे यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Congress Leader Came In Satara