अस्तित्वाच्या लढाईसाठी काँग्रेसची सज्जता

काँग्रेसचे नेते विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार, अशी हुल उठवली...
congress Vishwajeet kadam lok sabha election politics
congress Vishwajeet kadam lok sabha election politics sakal

काँग्रेसचे नेते विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार, अशी हुल उठवली जात होती. जिल्ह्यात काँग्रेसला कोणी वाली राहिले नाही, अशा चर्चा झडत होत्या. या सगळ्या चर्चांचा बाजार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका सभेने उठवला.

काँग्रेस संपली, असे म्हणणाऱ्यांची तोंडे बंद झाली. काँग्रेसमध्ये कदम गट-दादा गट असा सवतासुभा होता. विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांचे नेतृत्व स्वीकारत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी ‘मला सांगली लोकसभा, विधानसभा जिंकायची आहे,’ हा विश्‍वजित यांचा निर्धार भाजपच्या उरात धडकी भरवणार आहे. सन २०२४ चा आखाडा रंगतदार होणार, याची झलक दिसली. अस्तित्वाच्या लढाईला काँग्रेस सज्ज झाल्याचे दिसले.

- शेखर जोशी shekhar.vjosh@gmail.com

जिल्ह्यात गेल्या दशकभराचा काँग्रेसचा इतिहास पाहिला तर सगळी वजाबाकी दिसते. पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील असे एका पाठोपाठ एक दिग्गज नेते गेल्याने पोकळी निर्माण झाली.

ती भरून निघणारी नव्हतीच; पण काँग्रेसने पक्षबांधणीकडे लक्षही दिले नाही, हे नाकारता येणार नाही. शिराळा, सांगली, मिरज हे महत्त्वाचे गड काँग्रेसच्या हातून गेले. विश्वजित कदम यांच्यामुळे फक्त कडेगाव, पलूस आणि जतमध्ये काँग्रेस मजबूत राहिली. उर्वरित सहा तालुक्यांत काँग्रेसची अवस्था बिकट आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसचा देदीप्यमान विजय झाला. त्याचा सांगलीत जल्लोष झाला; मात्र ते वारे आपल्याला तारून नेईल, असे काँग्रेसला वाटत असेल तर ती फसगत ठरू शकते. कर्नाटकातील विजयाने चैतन्य दिले, लढण्याची वृत्ती दिला,

भाजपला एकजुटीने पराभूत करता येते, हा विश्‍वास दिला. तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यासाठी लागू केला तर येथे काँग्रेसची स्थिती सुधारू शकते.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या जोडीने कर्नाटकात जे केलं, ते सांगलीत विश्वजित आणि विशाल हे दोन तरुण नेते करू शकतील, असा आशावाद येथील काँग्रेस मेळाव्याने निर्माण केला आहे.

विश्‍वजित कदम यांनी आता जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा अश्‍वमेध आरंभला आहे. त्याची घोषणा करणाराच तो मेळावा ठरला. विशाल यांनी त्यांचे नेतृत्व मान्य करत काँग्रेस एकजुटीचा एक ‘कदम’ पुढे टाकला.

परंतु, केवळ भाषणात एकी असून चालणार नाही. काँग्रेसची नव्याने बांधणी करणे कठीण आव्हान आहे. राष्ट्रवादी विरोधी पक्ष असला तरी आक्रमक आहे. जयंत पाटील यांच्यासारखा धोरणी, अनुभवी नेता राष्ट्रवादीकडे आहे.

congress Vishwajeet kadam lok sabha election politics
Sangli : कर्नाटकसोबत पाणी करार कराच! 'या' 32 गावांना होईल लाभ; कायदेशीर स्वरूप देणं आवश्‍यक!

त्यामुळे काँग्रेसला राष्ट्रवादीशी सौहार्द राखतानाच भाजपशी दोन हात करावे लागतील, वजाबाकी थांबवून बेरजेचे राजकारण करावे लागेल. विश्वजित कदम यांची संस्थात्मक ताकद मोठी आहे. जिल्ह्यातील प्रमुख संस्थांत जिल्हा बँक, सांगली बाजार समिती राष्ट्रवादीच्या साथीने ताब्यात आहे.

वर्षभरात महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. विश्वजित, विशाल, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत, श्रीमती जयश्री पाटील या मोजक्या शिलेदारांवर काँग्रेसची भिस्त आहे.

congress Vishwajeet kadam lok sabha election politics
Solapur News : बीआरएस मायभूमी, भाजप कर्मभूमी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मांडली भूमिका

काँग्रेसचे नेटवर्क तळागाळात आहे. ते जागे करावे लागेल. एका सभेने ते साध्य होणार नाही. जनतेच्या प्रश्नांना भिडावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल.

जिल्ह्याच्या जनतेने भाजपला साथ दिली, मात्र अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. येथील उद्योग पिछाडीवर आहेत. कृषी उद्योग उभे राहिले नाहीत. पायाभूत सुविधांत थोडी सुधारणा झाली आहे; मात्र ड्रायपोर्ट, विमानतळाचे काय?

हे प्रश्‍न घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल का, याकडे लक्ष असेल. कारण, काँग्रेसला लढायचे असेल तर सैन्य हवे, रसद हवी आणि लोकांची साथही हवी. राष्ट्रवादी सांगली लोकसभा, विधानसभा, मिरज विधानसभा मागत आहे.

congress Vishwajeet kadam lok sabha election politics
Solapur News : पंढरपुरात भालकेंचा प्रवेश, सोलापूर शहरात चाचपणी; भाजप-काँग्रेसच्या १४ माजी नगरसेवकांशी संपर्क

काँग्रेसने जमीन पडीक ठेवल्याने ते घुसू पाहत आहेत. इथे मशागत करावी लागेल. कर्नाटकच्या प्रेरणेतून सांगलीच्या नेत्यांना जाग आल्याचे दिसते आहे. ते किती धावतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ऐक्याची भाषा अन् दिशा

काँग्रेस मेळावा भव्य झाला. गर्दी, मंडप, नियोजन सगळेच भव्य होते. आमदार विश्‍वजित कदम यांच्या कौशल्याचा तो नमुना म्हणावा लागेल. हा मेळावा काँग्रेसला पुन्हा भव्यता मिळवून देईल का, हे पाहावे लागेल. विश्वजित कदम,

विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांच्यातील टीमवर्कमुळे काँग्रेसमधील ऐक्याचा संदेश पक्षात पोहोचला आहे. ऐक्याची गुढी उभी राहिली आहे. सिद्धरामय्यांनी मंत्र दिला आहे. आता विश्वजित आणि विशाल यांची जबाबदारी वाढली आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com