Viral Video : आमदार पडळकरांची जीभ पुन्हा घसरली, जयंत पाटलांवर अत्यंत खालच्या पातळीत टीका

Jayant Patil : वडर यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करावी, अशी माझीच मागणी असून मी यासाठी जत पोलिसांना भेटणार आहे. त्यांनी सत्य बाहेर आणावे. त्यानंतर मी एकालाही सोडणार नाही.
Viral Video

Viral Video

esakal

Updated on

Sangli Politics : जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांच्या आत्महत्येशी माझा, माझ्या पीएचा, सुनील पवार यांचा कोणताही संबंध नाही. मी बहुजन मागास समाजातून येत असल्यानेच माझ्या बदनामीचे कुभांड जयंत पाटील यांनी रचले आहे. त्याला माजी आमदार विलासराव जगताप व विक्रम सावंत यांची फूस असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज केला. आमदार पडळकरांची बदनामी केल्याच्या निषेध म्हणून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी जत पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. यावेळी मोर्चासमोर ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com