शिर्डीत 15 फेब्रुवारीला "सहकार संवाद'

Cooperation Dialogue on February 15 in Shirdi
Cooperation Dialogue on February 15 in Shirdi

नगर : राज्यातील पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर, विशेषतः नियामक मंडळ, नियामक मंडळाने लादलेले अंशदान, पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर राज्य सरकार व सहकार खात्याकडे दाद मागण्यासाठी शिर्डी येथे शनिवारी (ता. 15) दुपारी दोन वाजता राज्यव्यापी "सहकार संवाद' मेळावा होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

नगर जिल्हा स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, शिवाजीराव कपाळे, कडूभाऊ काळे, सबाजीराव गायकवाड, रमेश मंत्री आदी उपस्थित होते. 

नियामक मंडळाची आवश्‍यकता नाही

कोयटे म्हणाले, ""महाराष्ट्रातील पतसंस्थांना अनेक संकटे व अडचणींचा सामना सध्या करावा लागत आहे. विशेषतः गेल्या वर्षी सहकार कायद्यामधील कलम 144नुसार पतसंस्थांच्या अंतर्गत कामकाजाचे नियंत्रण करण्यासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. वस्तुतः स्थिरीकरण व तरलता निधीचे कामकाज चालविण्यासाठी सहकार खाते किंवा राज्य शासनानेच आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे. अंशदान घेण्याची आवश्‍यकता नाही. मुळातच नियामक मंडळाचीदेखील आवश्‍यकता नाही, असे ते म्हणाले. 

पाच हजार जण सहभागी

पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे, हक्काची कर्जमाफी मिळावी, जिल्हा बॅंकांमध्ये आलेल्या ठेवी मिळाव्यात, थकबाकीदाराला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात यावे, थकबाकी वसुलीचा कायदा गतिमान करावा आदी मागण्या मेळाव्यात मांडण्यात येणार असल्याचे कोयटे व वसंत लोढा यांनी सांगितले. 
या मेळाव्यास सहकार व पणनमंत्री श्‍यामराव पाटील, मंत्री शंकरराव गडाख, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार आयुक्‍त अनिल कवडे, आमदार सुधीर तांबे आदी उपस्थित राहणार आहेत. या संवादात पाच हजार जण सहभागी होणार आहेत. 

आंतरराष्ट्रीय सहकार संवाद

देश-विदेशातील पतसंस्थांचे कायदे व कामकाज पद्धतीसंदर्भात माहिती व्हावी व जगातील सर्व देशांत पतसंस्था कार्यपद्धतीत समानता यावी, यासाठी आंतरराष्ट्रीय "सहकार संवाद' 15 फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या कालावधीत होणार आहे. यात जगातील सात पतसंस्थांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, असेही कोयटे यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com