स्मशानभूमीतच मुक्काम; 26 दिवसात 74 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार!

दोन सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात
स्मशानभूमीतच मुक्काम; 26 दिवसात 74 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार!
Updated on

इस्लामपूर (सांगली) : गेल्या २६ दिवसात सुमारे ७४ मृतदेहांवर इस्लामपूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने नेमलेला ठेकेदार दिलीप सावंत हा आपल्या सहकाऱ्यांच्यासमवेत स्मशानभूमीतच मुक्काम ठोकून आहे. मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी ही माहिती दिली. मागील वर्षी एका मृतदेहाच्या बाबतीत विटंबनेचा प्रकार घडला होता. त्यानंतर प्रशासनामने दिलीप सावंत यांना या कामाचा ठेकेदार म्हणून नेमणूक केली.

सावंत आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने येणाऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. स्वतः स्मशानभूमीत मुक्कामाला राहून ते जे काम करत आहेत, त्या कामाची तुलना इतर कशाबरोबर होऊच शकत नाही. स्मशानभूमी व त्याशी संबंधित सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत असतील, त्यातून लोकांच्या भावना दुखवल्या जावू नयेत, याची काळजी घ्यावी आणि काहीही शंका असली तरी प्राधान्याने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.

माळी म्हणाले, 'मागील मार्च महिन्यात फक्त १ मृतदेह होता तर गेल्या २६ दिवसात ७४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये इस्लामपूर शहरातील १०, सांगली जिल्ह्यातील २७ व जिल्ह्याच्या बाहेरील ३७ जणांचा समावेश आहे. कापुसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीत मृतदेहांची वाढती संख्या विचारात घेता शहरात दुसरीकडे स्मशानभूमी सुरू करण्याची मागणी होत आहे. त्याचा विचार सुरू आहे. गैरप्रकार होऊ नयेत यासाठी स्मशानभूमीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न आहे. गाफीलपणा झाल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल.

स्मशानभूमीतच मुक्काम; 26 दिवसात 74 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार!
नाद करायचा नाय! फॉर्च्युनर गाडीतून वांग्याची विक्री, चर्चा तर होणारच

जिल्ह्याचे पालकमंत्री व जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत ठरल्यानुसार त्यांच्या सूचना अंमलात आणल्या आहेत. शहरात सध्या २६६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. पालिकेने त्यांच्या घरावर स्टिकर चिकटवून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला आहे. तरीही लोक बाहेर पडतात. अशा काहींच्या तक्रारी आहेत. त्यांच्यापासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका विचारात घेऊन प्रभागनिहाय उपाययोजना सुरू केल्या आहेत.

१४ प्रभागासाठी ३ नियंत्रक तर प्रत्येक प्रभागात २ कर्मचारी रुग्णांचा दैनंदिन आढावा घेण्याचे काम करत आहेत. आंबेडकरनगर आरोग्य केंद्रातून आशा वर्कर रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली जात आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करून त्यांना समाजकल्याण विभागाच्या कोविड केंद्राच्या ठिकाणी हलवले जाईल. ५ पेक्षा जास्त रुग्ण असतील तर ती गल्ली सील केली जाईल आणि कंटेन्मेंट झोन केले जातील. नागरिकांनी स्वतःहून नियम पाळावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्मशानभूमीतच मुक्काम; 26 दिवसात 74 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार!
आयर्लंडची कमाल! काटेकोर नियमावलीने कोरोनाला रोखलं

इस्लामपूर शहर कोरोना सद्यस्थिती

शहरात एकूण ३२२ रुग्ण आहेत. त्यापैकी होम आयसोलेशनमध्ये २६६ रुग्ण तर कोव्हिड सेंटरमध्ये १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात ५ तर खासगी रुग्णालयात ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. कोविडमुळे शहरातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com