esakal | सांगलीत रुग्णसंख्या रोखण्यासाठी कठोर निर्बंध : जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत रुग्णसंख्या रोखण्यासाठी कठोर निर्बंध : जयंत पाटील

सांगलीत रुग्णसंख्या रोखण्यासाठी कठोर निर्बंध : जयंत पाटील

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाच्या (sangli district) रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. चौथ्या स्तरानुसार निर्बंध लागू असले तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही. सरकारच्या धोरणानुसार १० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर (positivity rate) आल्याशिवाय सद्यस्थितीत निर्बंधामध्ये शिथीलता मिळणार नाही. त्यामुळे हा दर कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी सद्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी आज दिल्या. पालकमंत्री पाटील यांची व्यापाऱ्यासमवेत स्वतंत्र बैठक झाली. त्यात मंत्री पाटील यांनी व्यापाऱ्यांना सहकाऱ्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर मंत्री पाटील पत्रकारांशी बोलले. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे उपस्थित होते.

हेही वाचा: 26 जुलैपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतुकीस बंद; प्रशासनाचा निर्णय

पालकमंत्री पाटील म्हणाले, धोरणानुसार १० टक्के पेक्षा कमी कोरोना पॉ‍झिटीव्हीटी दर आल्याशिवाय निर्बंधात शिथीलता आणता येणार नाही. त्यामुळे हा दर कमी करण्यासाठी सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सद्यस्थितीतील निर्बंधानुसार असणाऱ्या प्रतिबंधात्मक निर्बंधांची यंत्रणांनी कठोर अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात सध्या प्रतिदिन १४ हजारापर्यंत कोविड चाचण्यात होतात. १० हजार रूग्ण सक्रीय बाधीत आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के आहे. शिथीलता आणण्यासाठी हा दर कमी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी, दोन दिवसानंतर भाजीपाला घरपोच पोहोचविण्यावर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करावी. अनेक लग्न समारंभातील गर्दी नियंत्रणात आणावी. खाद्य पदार्थांच्या गाड्यावरील गर्दीही नियंत्रित करावी. गर्दीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. गेल्या दीड महिन्यापासून रूग्णसंख्या दर स्थिर असून तो अपेक्षित प्रमाणात कमी होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ‘

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी बैठकीत सांगितले की, कोरोना रूग्णसंख्या कमी होत नसून तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व व्यवहार सुरू केल्यास रूग्णसंख्या आणखी वाढून स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. या बाबी नजरेआड करून चालणार नाही. सद्यस्थितीत रूग्णसंख्या कमी करण्याला प्राधान्य द्यावे.

हेही वाचा: 'ॲपेक्स'च्या मान्यतेचीही CBI चौकशी लावा; आशिष शेलारांची मागणी

अपेक्सप्रकरणी राजकारण नको...

मिरजेतील अपेक्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकाच रुग्णालयात अनेक बळी जाणे ही बाब गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, चुका असतील तर कारवाई करण्यात गय केली जाणार नाही, मात्र त्याबाबत राजकारण करु नये, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. भाजपचे आशिष शेलार यांनी सरकारवरील टीकेबाबत पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारकडून लसी मागवा, मग अन्य प्रश्‍नांवर पुन्हा बोलू, असा टोमणा मारला.

loading image