esakal | सांगलीकर रुग्णसंख्या वाढत आहे; एकदा झाला म्हणून बिनधास्त राहू नका
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीकर रुग्णसंख्या वाढत आहे; एकदा झाला म्हणून बिनधास्त राहू नका

सांगलीकर रुग्णसंख्या वाढत आहे; एकदा झाला म्हणून बिनधास्त राहू नका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सांगली : गेल्या काही दिवसांत कोरोनाची पुन्हा बाधा (covid -19) झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. (sangli district) एकदा बाधित होऊन बरे झाल्यानंतर निर्धास्त राहून चालणार नाही, असेच चित्र आता पुढे आले आहे. त्यामुळे पूर्ण काळजी घेणे आणि वेळेत लसीकरण (covid -19 vaccination) करून घेणे महत्वाचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या वर्षी ते पहिल्यांदा बाधित झाले होते. शेट्टी हे सुपरिचित नाव असल्याने ‘असे कसे शक्य आहे’, अशी चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक, अनेकांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली आहे. थोड्याच दिवसांच्या फरकाने दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने अशा स्वरुपात पुन्हा बाधा झालेल्या रुग्णांची आकडेवारी स्वतंत्रपणे मोजलेली नाही. त्यामुळे ती उपलब्ध नाही, मात्र येथील डॉ. बिंदूसार पलंगे यांनी गेल्या काही दिवसांत पुन्हा कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले.

हेही वाचा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू नाही - केंद्र सरकार

कोरोनाची बाधा झाल्यानंतर शरिरात अँटी बॉडिज तयार होतात आणि किमान तीन महिने त्या प्रभावी काम करतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे तीन महिने लस घ्यायची नाही, असेही जाहीर केले आहे. असे असताना अगदी काही दिवसांच्या फरकाने पुन्हा बाधा झाल्याने रुग्णांमध्ये थोडे काळजीचे वातावरण आहे. या आजाराबाबत कैक गैरसमज आहेत. त्यातील एकदा कोरोना झाला की पुन्हा तीन-चार महिने बिनधास्त राहा, हाही एक आहे. तो बिनधास्तपणा किंवा थोडा हलगर्जीपणा पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणारा ठरतोय. त्यामुळे कोरोना होऊन बरे झाल्यानंतर बिनधास्त राहून चालणार नाही. काळजी घेत राहिलेच पाहिजे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे नियम पाळलेच पाहिजेत, हेही लक्षात घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

'एकदा कोरोना झाला आहे म्हणून पुन्हा बिनधास्त राहणे योग्य नाही. पुन्हा फिरून काही काळात बाधा झालेले अनेक रुग्ण आहेत. काळजी तर घेत रहावेच लागेल. कोरोना झाल्यानंतर शरीरात अँटी बॉडी तयार होतात, त्यामुळे बाधित होऊन बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी. नियमांचे पालन गरजेचे आहे.'

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी

हेही वाचा: KYC अपडेटच्या नावाखाली BSNL कर्मचाऱ्याला गंडा; CEN ची धडक कारवाई

loading image