Coronavirus : सातारा : 'त्या' तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह; होम क्वॉरंटाईनवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020


राज्यात कोरोना विषाणूचा (कोविड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. एका व्यक्तीस होम क्वॉरंटाईन म्हणून घोषित करून घराबाहेर कोठेही बाहेर फिरण्यास बंदी केली होती, तरीही ही व्यक्ती सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेली.

सातारा : अबुधाबी येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक व 39 वर्षीय पुरुष आणि कॅलिफोर्निया येथून आलेली 51 वर्षीय महिला असे एकूण तिघांना काेराेना अनुमानित म्हणून  क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले होते. त्या तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

सातारा जिल्ह्यात काेराेनाचे 16 संशीयत रुग्ण दाखल झाले हाेते. त्यातील दाेन जणांचे दाेन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या दाेन्ही रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुुरु आहेत. तसेच 14 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज बुधवार सायंकाळी पाच पर्यंत काेराेनाबाबतचा काेणताही नवा रु्गण जिल्हा रुग्णालयात दाखल झालेला नाही अशी माहिती डाॅ. गडीकर यांनी दिली.

कोरोना इफेक्‍ट... 
जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण : 16 
रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले रुग्ण : 2 
रिपोर्ट निगेटिव्ह आलेले रुग्ण : 14 
रिपोर्टची प्रतीक्षा असलेले रुग्ण : 00
निगेटिव्ह रिपोर्टमुळे घरी सोडलेले रुग्ण : 10 
रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण : 6 
निरीक्षणाखाली असलेल्या व्यक्ती : 369 
14 दिवसांचा कालावधी संपलेले रुग्ण : 121 
घरातच निरीक्षणाखाली असलेले नागरिक : 248 

होम क्वॉरंटाईनवर गुन्हा दाखल

फलटण शहर : होम क्वॉरंटाईन असणाऱ्यांना घराबाहेर जाणे किंवा बाहेर फिरण्यास बंदी असतानाही बाहेर पडल्याप्रकरणी एकावर बरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिस पाटील समाधान महादेव कळसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका व्यक्तीला होम क्वॉरंटाईन म्हणून घोषित करून घराबाहेर कोठेही बाहेर फिरण्याची परवानगी नसताना त्याने या गावातील इतरांना त्रास होईल, असे वागल्याने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.

#WeVsVirus : ब्राॅडबॅंड कनेक्शनसाठी आम्हांला संपर्क साधा : बीएसएनएल

चर्चाच चर्चा; पुस्तकांच्या गावातील या गुढीचीच चर्चा

राज्यात कोरोना विषाणूचा (कोविड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. एका व्यक्तीस होम क्वॉरंटाईन म्हणून घोषित करून घराबाहेर कोठेही बाहेर फिरण्यास बंदी केली होती, तरीही हा व्यक्ती सकाळी मॉर्निंग वॉक करीत असताना मिळून आला. म्हणून त्याच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदाप्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Three Suspected Patient Report Recevied In Satara

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: