या राज्याचे क्रीडा विकासा व्हीजन तयार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

14 क्रीडा प्रकारांतून 62 खेळाडूंची निवड 
शासनाच्या योजनेप्रमाणे प्रत्येक तालुक्‍यात क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. राज्य व विभागीय क्रीडा संकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी व्हीजन तयार करण्यात आले होते. हे व्हीजन त्यापुरते मर्यादित न राहता आता पुढेही चालू असणार आहे. त्यासाठी 14 क्रीडा प्रकारांतून 62 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

सोलापूर : खेळाडू आणि खेळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना आहेत. तसेच, राज्य व विभागीय क्रीडा संकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडा विकासासाठी आता राज्याचे व्हीजन तयार करण्यात येत असून यासाठी मोठा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालयाचे सहसंचालक जयप्रकाश दुबले यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा : सोलापूरच्या प्रगती सोलनकरला पराभावाचा धक्‍का 

सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनतर्फे सिटी पार्क येथे "क्रीडा क्षेत्रातील अडचणी व क्रीडा विकासासाठी शासचाने धोरण'विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. श्री. दुबले यांचा क्रीडा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र पुंजाल, सचिव महेश गादेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, महापालिका क्रीडाधिकारी नजीर शेख, झुबेन अमारिया, सोलापूर विद्यापीठाचे समन्वयक एस. के. पवार, छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते हाजी मलंग नदाफ, जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख, सचिव पार्वतय्या श्रीराम, एम. शफी, प्रकाश भुतडा, मनमोहन भुतडा, संतोष गवळी, अनिल पाटील, संतोष खेंडे, अविनाश गोसावी, सुनील देवांग, श्रीकांत कांबळे, मिलिंद गोरटे, आनंद चव्हाण, राजू माने, किरण चौगुले, राजू प्याटी, स्नेहल पेंडसे, श्रीकांत ढेपे, केवल उत्पात, मरगू जाधव, के. टी. पवार आदी उपस्थित होते. 
श्री. दुबले म्हणाले, खेळाडू आणि खेळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना आहेत. गाव तिथे क्रीडांगण, शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य, व्यायाम शाळा अशा अनेक योजना आहेत. पुरणचंद्र पुंजाल यांनी प्रास्ताविक केले. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हाजी मलंग नदाफ यांनी आभार मानले. 

हेही वाचा : माणदेश मॅरेथॉन स्पर्धेत औरंगाबादचा धनवंत रामसिंग, पुण्याची नयन किरदक विजेते 

"क्रीडांगण व मूलभूत सुविधा आवश्‍यक' 
सोलापुरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पदक मिळवून देत आहेत. परंतु, सोलापुरात क्रीडांगण, प्रशिक्षण व मूलभूत सुविधांची गरज आहे, अशी माहिती सोलापुरातील क्रीडा संघटकांनी दिली. या वेळी सहसंचालक जयप्रकाश दुबले यांच्यासमोर विविध संघटनेच्या क्रीडा संघटकांनी आपापल्या अडचणी मांडल्या. क्रीडा संघटक म्हणाले, सर्व संघटना कार्यरत आहेत. खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. डायव्हिंग, योगासन, बुद्धिबळ यासह अन्य खेळांत सोलापूर आघाडीवर आहे. या खेळाडूंना चांगली मैदाने नाहीत. बॉक्‍सिंगसाठी रिंगची गरज आहे, योगासनासाठी मोठा हॉल, खेळाडूंसाठी वसतिगृह, खेळाडूंसाठी एसटी व रेल्वे सवलत, शूटिंगसाठी मोठ्या हॉलची गरज आदी विविध मागण्या करण्यात आल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Create a sports development vision for this state