सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून

औद्योगिक वसाहतीतील सिमेंट कारखान्यानजीक रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
 crime news
crime newssakal media
Summary

औद्योगिक वसाहतीतील सिमेंट कारखान्यानजीक रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

सांगली : संशयावरून सतत वाद घालून भांडण काढत असल्याच्या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अतीश बबन कांबळे (वय २२) असे मृताचे नाव आहे. तर तुषार बबन कांबळे असे संशयिताचे नाव आहे. औद्योगिक वसाहतीतील सिमेंट कारखान्यानजीक रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजयनगरमध्ये राहणारा अतीश कांबळे व्यसनाच्या आहारी गेला होता. सतत नशेत असायचा. लहान भाऊ तुषारवर संशय घेऊन अतीश सतत वाद घालायचा. वेळप्रसंगी कडाक्याचे भांडण करी. सततच्या त्रासाला तुषार वैतागला होता. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारासही दोघा भावांमध्ये वाद झाला. वादातूनच तुषारने सिमेंट कारखान्यानजीक पडलेला दगड उचलून मोठा भाऊ अतीशच्या डोक्यात घातला.

 crime news
केंद्राच्या मदतीनेच परमबीर सिंग देशाबाहेर 'पळवले' गेले: संजय राऊत

घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अतीश जखमी असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. खुनाची घटना समजताच पोलिस उपाधीक्षक अजित टिके, संजयनगरचे पोलिस उपनिरीक्षक डोंगरे यांच्यासह पोलिसांनी तेथे धाव घेतली. प्राथमिक माहिती घेतली. काही वेळातच संशयित तुषारला ताब्यात घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com