esakal | सायकलवेडे ग्रुपची गाेवा माेहिम फत्ते

बोलून बातमी शोधा

null

या कामगिरीबद्दल या साहसी वीरांचे परिसरात कौतुक होत असून, अनेकांसाठी त्यांची ही मोहीम प्रेरणादायी व आरोग्य जागृतीचे नवे पर्व सुरू करणारी ठरत आहे.

सायकलवेडे ग्रुपची गाेवा माेहिम फत्ते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुईंज (जि. सातारा)  : रोज व्यायामासाठी सायकलवरून 30 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या येथील सहा साहसी वीर युवकांनी तब्बल 400 किलोमीटरचे अंतर 19 तास 25 मिनिटांत पूर्ण केले. त्यांच्या या साहसाचे परिसरात कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
येथे सायकलवेडे ग्रुपच्या सागर दळवी, योगेश शिर्के, अनिल लोखंडे, घनश्‍याम जाधवराव, संतोष मोरे आणि गौरव जाधवराव यांनी ही मोहीम पार केली. दररोज पहाटे भुईंज ते वेळे अशी तीस किलोमीटरची सायकल दौड करणाऱ्या या सायकल वेड्यांनी आतापर्यंत पाचगणी, कास, कोल्हापूरपर्यंत सायकल दौड केली आहे. यातून वाढलेल्या आत्मविश्वासातून त्यांनी थेट पणजी गोव्याची मोहीम आखली. सुरुवातीला त्यांना सायकलवरून कुणी इतक्‍या लांब जातं का? असे टोमणे मिळाले; पण त्याच्या शतपटीने प्रोत्साहन, मार्गदर्शन करणाऱ्यांचीही मोलाची मदत झाली. या मोहिमेतील अडचणी, राहाण्याची सोय, बॅकअप कार, सायकल मेंटेनन्स आणि सायकलस्वारांचा फिटनेस ही सर्व पूर्वतयारी करण्यात आली. टीम लीडर योगेश शिर्के आणि संतोष मोरे यांनी ती जबाबदारी पार पाडली. प्रत्यक्ष एकूण 19 तास 25 मिनीट सायकलिंग करत हे साहसी वीर कलिंगुट बिचवर पोचले आणि ध्येय साकारले. सर्व प्रवासादरम्यान पायलट म्हणून आपल्या चारचाकी वाहनासह धनंजय भोसले यांचे सहकार्य लाभले. या कामगिरीबद्दल या साहसी वीरांचे परिसरात कौतुक होत असून, अनेकांसाठी त्यांची ही मोहीम प्रेरणादायी व आरोग्य जागृतीचे नवे पर्व सुरू करणारी ठरत आहे. 

हेही वाचा : भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी

नक्की वाचा : बाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही; फलटणच्या राजेंनी भाजपात जावे

जरुर वाचा : हुतात्मा संदीप सावंत कुटुंबियांना 50 लाखांची मदत


खोडशीतील विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक 

वहागाव (जि. सातारा) : खोडशी येथील (कै.) रामचंद्र ज्ञानोबा भोसले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी येथे रस्त्यात सापडलेला मोबाईल संच मुख्याध्यापकांकडे प्रामाणणिकपणे जमा केला. खोडशी येथील विद्यार्थी वैभव कांबळे, याकुब बागवान व रोहन भोसले दहावीच्या परीक्षेसाठी येथील आण्णाजी पवार विद्यालयात परीक्षेसाठी गेले होते. त्या वेळी रस्त्यावर अँड्रॉईड मोबाईल सापडला. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार घारे यांच्याकडे प्रामाणिकपणे जमा केला. श्री. घारे यांनी संपर्क साधून संबंधित मोबाईल मालक शरद पवार यांना तो परत केला. खोडशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल केंद्रसंचालक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रावरील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले.