`या` स्मार्ट सिटी एबीडी एरियात 2021 पासून रोज पाणी

`या` स्मार्ट सिटी एबीडी एरियात 2021 पासून रोज  पाणी
Updated on: 

सोलापूर ः स्मार्ट सिटी एबीडी एरियात जानेवारी 2021 पासून रोज दोन तास पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक तावरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

एबीडी एरियाचे 22  विभाग
एबीडी एरियाचे पाणीपुरवठ्यासाठी 22 विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागाचे डिझाईन करण्यात आले आहे. ही रचना करताना 2018 आणि 2051 ची संभाव्य लोकसंख्या अपेक्षित धरण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या भागातील लोकांना दरडोई 70 ते 90 लिटर पाणी रोज मिळणार आहे. 

तब्बल 57 टक्के गळती 
एबीडी एरियात सध्या असलेल्या जलवाहिनीतून सुमारे 57 टक्के पाण्याची गळती होते. ही संपूर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. आणि त्या ठिकाणी सुमारे 50 ते 55 वर्षे टिकेल अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर सध्या असलेली 57 टक्के गळती ही 10 टक्क्यांवर येणार आहे. 

98 किलोमीटर जलवाहिनी
एबीडी एरियामध्ये तब्बल 98 किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रमुख रस्त्यांवर 21 किलोमीटर व इतर ठिकाणी 77 किलोमीटरची जलवाहिनी असणार आहे. याशिवाय 111 किलोमीटर ड्रेनेज टाकण्यात येणार असून, त्याची लांबी 18 आणि 93 किलोमीटर असणार आहे. 

योजनेसाठी खास अधिकाऱ्यांची नियुक्ती
या योजनेसाठी मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी एन. एच. कुसनूर आणि आर. एम. चौकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुसनूर हे जलतज्ञ असून, चौकर हे ड्रेनेज विभागाती तज्ज्ञ आहेत. या दोघांनीही सध्या सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ped Water Shortage
Mumbai Bengaluru Special Train
TET Exemption Plea Rejected
Koyna Dam additional water demand for Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com