उद्धवसाहेब `या ` खेकड्याच्या नांग्या वेळीच मोडा.. कुठे लावलाय हा फलक चला पाहूया...

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

शिवसेनेपेक्षा कोणी मोठा नाही
महाराष्ट्रात म्ही पक्ष वाढविताना अनेक गु्न्हे अंगावर घेतले. चौकटीत राहून पक्ष वाढविला. कोण कितीही मोठा असला तरी तो पक्षापेक्षा, शिवसेनेपेक्षा मोठा नाही. आम्ही पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. गद्दारांचा बंदोबस्त लवकरच होईल.
- प्रताप चव्हाण, उपजिल्हा प्रमुख

सोलापूर ः मंत्रीपदी निवड झाल्यावर काही महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले, त्याच ठिकाणी तानाजी सावंत यांच्या निषेधाचा फलक काही वेळापूर्वी  लावण्यात आला आहे. उद्धवसाहेब हा खेकडा उस्मानाबाद व सोलापूरची शिवसेना पोखरत आहे. या खेकड्याच्या नांग्या वेळीच मोडा असा उल्लेख असलेल्या फलकावर खेकड्याचे छायाचित्र असून त्यामध्ये सावंत यांची प्रतिमा आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात लावण्यात आलेल्या या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लक्षवेध - राजे व ठाकरेंच्या भेटीची चर्चा 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील घडामोडीचा परिणाम
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत शिवसेनेचे उपनेते प्रा. तानाजी सावंत यांच्या सात उमेदवारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. त्याचवेळी आमदार सावंत यांच्या पुतण्याला मात्र उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. परिणामी प्रा. सावंत यांच्या भूमिकेवर सोलापूर जिल्ह्यातील एकनिष्ठ शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. 

हेही वाचा - अरे बापरे, ज्वारीला भरेनात दाणे

शिवसैनिक सावंतांवर संतापले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश डावलून शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले डॅा. सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपला साथ दिली. यावरून सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक संतापले आहेत. पक्ष गद्दारांचा बंदोबस्त करेल, सोलापुरात सावंत यांचे पुतळे जाळण्यात येतील, अशा प्रतिक्रिया एकनिष्ठ शिवसैनिकांतून व्यक्त होत आहेत.

हेही वाच - शेतकरी आत्महत्येची जबाबदारीही पवारांनी स्वीकारावी

मुख्यमंत्र्यांसमवेत वादाच्या बातम्या पसरविल्या
मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वाद झाल्याच्या बातम्या प्रा. सावंत यांनीच पसरविल्या. आता उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील घडामोडींची घटना आहे. हे पाहिल्यावर माझ्यासारखा शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक सावंत यांचे हे कृत्य सहन करून घेणार नाही. सावंत ठाकरे कुटुंबियांचा अवमान करणार असतील तर हे आम्ही खपवून घेणार नाही, त्यांचे पुतळे आम्ही जाळू. सावंत यांच्या भूमिकेचा निषेध करतानाच या प्रकरणी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
- पुरुषोत्तम बरडे, शिवसेनेचे नेते,सोलापूर

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a digital board publish in solapur against shivsena leadar pra, tanaji sawant