Belgaum market
Belgaum marketsakal media

Belgaum : बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल; दसऱ्यानिमित्त खरेदी

शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली तसेच शहापूर बाजारपेठेत गर्दी झाली होती

बेळगाव : विजयादशमीनिमित्त बाजारात शुक्रवारी (ता. १५) कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सोने-चांदी खरेदी, फर्निचर, फ्लॅट बुकिंग आणि दुचाकी-चारचाकी वाहन खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळाला. खरेदीच्या निमित्ताने शहरातील रस्ते काही काळ गर्दीने फुलले होते.

Belgaum market
"काश्मीरसाठीचा ८० टक्के पैसा राजकारण्यांच्या खिशात"

शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली तसेच शहापूर बाजारपेठेत गर्दी झाली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. शुक्रवारी प्रामुख्याने सराफ बाजारासह शहर परिसरातील विविध सराफी प्रतिष्ठानांमध्ये ग्राहकांची वर्दळ दिसून आली. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीची परंपरा अनेकांनी पूर्ण केली. नामांकित सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दीचे चित्र दिसले. तर इतर दुकानामध्ये तुरळक प्रमाणात ग्राहक होते. दसऱ्यामध्ये बऱ्यापैकी उलाढाल झाल्यामुळे दिवाळीत त्याहून अधिक उलाढाल होईल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स्‌ बाजारातही मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. विक्रेत्यांनी दिलेल्या खास सवलती आणि ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घेतला. त्यामुळेच यंदा ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शुक्रवारी स्मार्ट फोन्स्‌ना तरुणाईसह ज्येष्ठांनी पसंती दिल्याचे चित्र होते.

रेडिमेड कपडे, साड्या आदी खरेदीसाठी शहरातील विविध कापड दुकानात ग्राहकांची मोठी लगबग दिवसभर दिसून आली. कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे यंदा दसरा सण चांगल्या पद्धतीने कॅश करता येईल, हे गृहित धरत व्यापाऱ्यांनी नवीन कलेक्शन आणत आपली दालने सज्ज ठेवली होती. होम अँड किचन अप्लायन्सेस मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह, टोस्टर, ज्युसर, रोटी मेकर, वॉटर प्युरिफायरसह मोबाइल, स्मार्ट टिव्हीची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदाच्या दसऱ्याला ऑटोमोबाईल क्षेत्राला बुस्टर मिळाल्याचे चित्र दिसून आले. दुचाकी चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदीही झाली. दसऱ्याच्या मुहुर्तावर काही फ्लॅटसचे बुकिंग, नवीन साईटचे भूमिपूजन झाले.

Belgaum market
"अमेरिकी कंपन्यांकडून भारताच्या आर्थिक सुधारणांचं कौतुक"

"नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसाच्या कालावधीत बेळगाव जिल्ह्यात सोने-चांदीला चांगली मागणी होती. लोक मुहूर्ताची वाट पाहत होते. नवरात्रोत्सवात नागरिकांनीही मनमुरादपणे खरेदी केली. नऊ दिवसात जिल्ह्यात सुमारे १०० कोटींची उलाढाल झाली."

- अनिल पोतदार, सुवर्णकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com