esakal | पुणे-यवतमाळ प्रवासाच्या कळा त्यात बाळंत कळा.. मग बँकेच्या एटीएममध्ये डिलिव्हरी
sakal

बोलून बातमी शोधा

Delivery of a woman to a bank ATM ...

वाघोली (पुणे) येथे दोन वर्षापासून आदिवासी समाजातील संदीप विठ्ठल काळे व पत्नी निर्मला रोजंदारीचे काम करत होते. निर्मलाचे दिवस भरत आल्याने संदीप पत्नी निर्मला मुलगी आरती (वय-३) बहीण पंचफुला व मेव्हणा कैलास घंगाडेसह पायी वागत (ता.महागाव जि.यवतमाळ) येथे निघाले होते. पाच मुक्कामानंतर हे कुटूंब आज वडाळा बहिरोबा येथे आले असता निर्मलास वेदना सुरु झाल्या.

पुणे-यवतमाळ प्रवासाच्या कळा त्यात बाळंत कळा.. मग बँकेच्या एटीएममध्ये डिलिव्हरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनई: गरोदर पत्नीला घेवून पुण्यातून यवतमाळला पायी जात असलेले कुटूंब वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथे येताच महिलेस प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. बसस्थानकासमोरील बँक ऑफ बडोदाच्या आवारात तीची प्रसूती होवून कन्यारत्न झाले आहे.

वाघोली (पुणे) येथे दोन वर्षापासून आदिवासी समाजातील संदीप विठ्ठल काळे व पत्नी निर्मला रोजंदारीचे काम करत होते. निर्मलाचे दिवस भरत आल्याने संदीप पत्नी निर्मला मुलगी आरती (वय-३)
बहीण पंचफुला व मेव्हणा कैलास घंगाडेसह पायी वागत (ता.महागाव जि.यवतमाळ) येथे निघाले होते. पाच मुक्कामानंतर हे कुटूंब आज वडाळा बहिरोबा येथे आले असता निर्मलास वेदना सुरु झाल्या.

हेही वाचा - याचा नीचपणा म्हणायचं नाही तर आणखी काय

वडाळ्याचे उपसरपंच राहुल मोटे व आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मोटे यांनी त्यांची अडचण लक्षात घेवून तातडीने ग्रामस्थ लता उनावळेच्या मदतीने महिलेस बॅक ऑफ बडोदाच्या इमारतीमध्ये आसरा दिला. येथे आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिका सोनाली न्यालपेल्ली व वनीता काळेने प्रसूती केली.
महिलेस कन्यारत्न झाले असून मायलेकी सुखरुप आहेत.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अभिराज सुर्यवंशी, कामगार तलाठी श्रीकांत भाकड यांनी भेट देवून कुटूंबाला आधार देत पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याची व्यवस्था केली. सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील नीलेश मोटे, सचीन बहादूरे, अभिजीत पतंगे, गणेश फाटके आदींनी विशेष परीश्रम घेत सहकार्य केले.
 

loading image