Lingayat Community : मराठ्यांनंतर लिंगायत समाज मैदानात; कुणबी असल्याचा दावा करत 'ओबीसी'त घेण्याची केली मागणी

मराठा समाजाचा ओबीसीत (OBC Category) समावेश करण्यात आल्याबद्दल लिंगायत समाजाने अभिनंदन केले.
Lingayat Community OBC Category
Lingayat Community OBC Categoryesakal
Summary

लिंगायत कुणबी नोंदी सापडणे म्हणजे समाजाची ओबीसीत समावेशाची मागणी रास्त होती, हेच सिद्ध होते.

सांगली : शेती करणारा कुणबी या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी असणारा लिंगायत समाज (Lingayat Community) हादेखील कुणबी आहे. त्यामुळे या समाजाचा इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन आज गावागावांतील लिंगायत समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.

Lingayat Community OBC Category
कोयना धरणातून पाणी सोडण्यास शंभूराज देसाईंची आडकाठी; ताकारी योजना बंद करण्याची वेळ, कृष्णेचं पात्रही पडणार कोरडं?

मराठा समाजाचा ओबीसीत (OBC Category) समावेश करण्यात आल्याबद्दल लिंगायत समाजाने अभिनंदन केले. सोबतच तसाच न्याय लिंगायत समाजाला मिळावा, अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे, की लिंगायत हा मागास, अतिमागास, कष्टकरी आहे. तो बाराव्या शतकात उदयास आला. महात्मा बसवेश्‍वरांनी कष्टकरी, बहुजन समाज घटकांना घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली.

Lingayat Community OBC Category
मोठी बातमी! ..अखेर ऊसदराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन मागे; 'इतक्या' रुपयांवर निघाला तोडगा

आता मराठा आरक्षणासाठी कागदपत्रे शोधत असताना अनेक ठिकाणी लिंगायत कुणबी, कुणबी लिंगायत, माळी कुणबी, तेली कुणबी, कुंभार कुणबी अशा नोंदी आढळत आहेत. त्यामुळे लिंगायत कुणबी नोंदी सापडणे म्हणजे समाजाची ओबीसीत समावेशाची मागणी रास्त होती, हेच सिद्ध होते. लिंगायत समाज ६५ मागास, अतिमागास घटकांनी बनला आहे. त्यात शेती करणे, शेतीपूरक व्यवसाय करणे हाच मुख्य कामाचा भाग आहे.

परंतु, जातिव्यवस्था मान्य नसल्याने अनेक ठिकाणी जातीचा उल्लेख नाही, तिथे लिंगायत असा उल्लेख झालेला आहे. आता शासनाच्या लेखी नोंदी आळल्याने सारासार विचार करून लिंगायत समाजाच्या मागणीला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. समाजाचे अध्यक्ष रमेश कुंभार, उपाध्यक्ष गजानन अडीमनी, सचिव सुरेंद्र बोळाज, राजेश साबणे, पंचाक्षरी बोळाज, राजशेखर बोळाज, जयराज सगरे, रोहित हेडगुदी आदी उपस्थित होते.

Lingayat Community OBC Category
Raju Shetti : पुणे-बंगळूर महामार्गावर तब्बल आठ तासांचे चक्काजाम आंदोलन; वाहतूकदारांचे हाल, 600 पोलिसांचा बंदोबस्त

महामंडळाचे फायदे नाहीत

शासनाने लिंगायत समाजासाठी स्थापन केलेल्या महामंडळाचे किंवा अन्य कोणत्याही योजनेचा फायदा समाजाला मिळत नाही. शासनाने अधिसूचित केलेल्या जातीचा उल्लेख समाजाच्या कोणत्याही अभिलेख सदरी उल्लेख नसल्याने ही वेळ आली आहे. आता मराठा समाजाला न्याय हक्क देत असतानाच त्या निकषांच्या आधारे लिंगायत समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com