...'त्यामुळे मंत्री जोल्ले यांच्यावर गुन्हा दाखल करा' 

demands for crime filed against Minister shashikala Jolle
demands for crime filed against Minister shashikala Jolle

निपाणी : बंगळूर येथे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व सर्वपक्षीय नेत्यांची सभा झाली. त्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन  कोरोना या महारोगाचा सामना करुया, विरोधी पक्षनेत्यांची सूचना विचारात घेऊन एकत्रितपणे कार्य करण्याचे ठरविण्यात आले. असे असताना निपाणीत मात्र स्थानिक आमदार व राज्याच्या विद्यमान मंत्री शशिकला जोल्ले यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या कार्यकर्त्यां समवेत हास्यास्पद प्रकार केला आहे. तो अत्यंत निंदनीय असून या घटनेचे प्रशासन यंत्रणा व पोलिस यंत्रणेने गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन आरपीआय, कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदारांना सोमवारी(ता.३०) निवेदन दिले.

निवेदनातील माहिती अशी, संपूर्ण देशात संचारबंदी आहे. देशातील सर्व नागरिकांनीही या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. पण 
मंत्री जोल्ले यांनी नियमाचे पालन केलेले नाही. आम्ही विविध राजकीय पक्षाचे जबाबदार नागरिक सवंग लोकप्रियतेच्या मागे न जाता आपल्या परीने या महामारीचा मुकाबला करीत आहोत. शासनाचे आदेश हे सर्वसामान्य नागरिक व आमदार या सर्वांना सारखेच लागू आहेत. परंतु निपाणीत मात्र सामान्य नागरिकांना एक कायदा व आमदारांना एक कायदा असे का? पहिल्याच रात्री पोलीस यंत्रणा ,सर्व गाड्या लाल दिवे व सायरनसहित शहर व उपनगरात फेरी काढताना नजरचुकीने पाहणाऱ्यांना पोलिस यंत्रणेने दमदाटी केली. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस यंत्रणेनेबरोबर मंत्री शशिकला जोल्ले व  कार्यकर्त्यांचा धिंगाना थोपविण्यात पोलिस यंत्रणा निष्क्रिय ठरलेली आहे. यामुळे त्यांच्यावर त्वरीत कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे. 

माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सीटू संघटनेचे अध्यक्ष काॅ. चंद्रकांत खराडे, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अविनाश कट्टी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई- सरकार डॉ जसराज गिरे, संजय माजी नगरसेवक दिलीप पठाडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या निवेदनाची प्रत मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक यांनाही देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com