esakal | खुशखबर! डिजीटल सातबारा मिळणार आता घरपोच I Digital
sakal

बोलून बातमी शोधा

सातबारा

सुधारित डिजीटल संगणकीय सातबारा नेमका कशा रूपात आणला आहे, याची उत्सुकता खेड्यातील सामान्य शेतकऱ्याला आहे.

खुशखबर! डिजीटल सातबारा मिळणार आता घरपोच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सुधारीत डिजीटल संगणकीय सातबारा उतारा शेतकऱ्यांच्या घरी जावून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूलचा विभागाच्या या उपक्रमामुळे संगणकीय दुरुस्ती करताना झालेल्या त्रुटीमध्ये सुधारणाही केली जाणार असल्याने या निर्णयाचा खेड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७० हजाराहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत मोहिमेतून उताऱ्यांचे वाटप झाले आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा विविध बदलांसह संगणकावर गेला आहे. मात्र, सरकारने आपला सुधारित डिजीटल संगणकीय सातबारा नेमका कशा रूपात आणला आहे, याची उत्सुकता खेड्यातील सामान्य शेतकऱ्याला आहे. आपण त्याला सातबाऱ्याची ही नवीन प्रत मोफत द्यायला हवी, अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. यामुळे महसूल विभागाची यंत्रणा आता जिल्ह्यातील साडेसात लाख उताऱ्यांचे मोफत वाटप करणार आहे. मात्र, त्यासाठी नेमकी रुपरेषा जाहिर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: "अजूनही मीच मुख्यमंत्री..." अखेर फडणवीसांचे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांचा सातबारा नव्या रुपासहीत दुरुस्त केला आहे. मात्र, हाच सातबारा आता डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. संगणकावर सातबारा उपलब्ध असला तरी तांत्रिक साधनांअभावी खेड्यांमधील प्रत्येकाला तो बघता आलेला नाही. आपणच प्रथम त्याच्या दारात जायला हवे. त्याचा नव्या सातबारा त्याला दाखवायला हवा. त्यांचे वाचन त्याच्यासमोर करुन काही दुरुस्ती असल्यास तशी दुरुस्ती करायला हवी, अशी भूमिका महसूलमंत्र्यांनी मांडली. हा उपक्रमाचे महसूल विभागाने स्वागत केले आहे.

डिजीटल सातबाऱ्यात दहा-बारा बदल आहेत. क्युआर कोड, राजमुद्रा असलेला नव्या रूपातील संगणकीय सातबारा मोफत आपल्या दारात आल्याचे पाहून काही नवख्या ग्रामस्थांना धक्का बसणार आहे. सातबारा वाटपाच्या निमित्ताने प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या दारात जाण्याची संधी महसूलला आहे. मंत्रालय ते गावतलाठ्यापर्यंत मोफत सातबारा वाटपाच्या मोहीम राबविली जाणार आहे.

महसूलचा उपक्रम...

* शेतकऱ्यांचे कागदोपत्री सातबारा आता संगणकात साठवले
* उतारे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन रूपात उपलब्ध
* हेच उतारे बॅंका, कृषी विभागाकडेही उपलब्ध
* संगणकीय उताऱ्यांचे पीडीएफ फाईलमध्ये रुपांतरीत होणार
* गावोगावी सातबारा उताऱ्याची प्रत मोफत वाटणार

हेही वाचा: पोटच्या लेकराकडून घात; डोक्यात पार घालून वडिलांचा केला खून

संगणकीय सातबारासह डिजीटल स्वाक्षरीच्या सातबारा उतारे खेड्यातील शेतकरी प्रथमच पाहतील. त्यांचे स्वागत असेल. मोहिमेमुळे सातबारातील त्रूटी दूर झाल्या तर महसूलच्या मोहिमेचे हे मोठे यश ठरेल.

- संजय कोले, सहकार आघाडी, शेतकरी संघटना.

जिल्ह्यातील आठ लाखावार शेतकरी खातेदारांना संगणकीय डिजीटल उतारे मोफत देण्याची मोहिम सुरु झालेली आहे. मोहिम दीर्घ काळ सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांच्या वाटपानंतर त्यात शेतकऱ्यांनी सांगितलेल्या सुधारणांचे अपडेट केले जात आहे. शासन निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

- मौसमी बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली.

हेही वाचा: लवकर बरे व्हा! PM मोदींकडून मनमोहन सिंगांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना

loading image
go to top