Vidhan Sabha 2019 : पंढरपूर आणि सांगोल्यात आघाडीत बिघाडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघात अखेर राष्ट्रवादी आणि काॅग्रेस उमेदवार आमने सामने आले आहेत. काॅग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम राहिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

पंढरपूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघात अखेर राष्ट्रवादी आणि काॅग्रेस उमेदवार आमने सामने आले आहेत. काॅग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम राहिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

दुसरीकडे सांगोल्यात ही राष्ट्रवादी आणि शेकापची गेल्या अनेक दशकापासून असलेली अभेद्य युती या निवडणूकीत तुटली आहे. येथे शेकापचे जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुखाचे नातू अनिकेत  देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे आणि शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्याशी लढत होणार आहे.

पुण्यातील या प्रमुख बंडखोरांनी घेतली माघार

पंढरपुरात महायुतीने माजी आमदार सुधाकर परिचारक यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते समाधान आवताडे यांनी बंडखोरी केली आहे. तर शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

पंढरीच्या कुरुक्षेत्रावर आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक आणि बंडखोर भाजप नेते समाधान आवताडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. येथील हायव्होलटेज लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute in alliance at Pandharpur and Sangola vidhansabah election