इथे जाणाऱ्या कामगारांना जिल्हाबंदीचा फटका

District ban affected workers going to Kolhapur and Karad
District ban affected workers going to Kolhapur and Karad

येडेनिपाणी (जि.  सांगली) : येथील परिसरातील कोल्हापूर व कराड येथे कामास जाणाऱ्या कामगारांचा प्रश्न सध्या जिल्हाबंदीमुळे ऐरणीवर आला आहे. काही कंपन्यांनी अद्यापही काम सुरू केले नाही. तर काहींनी केले मात्र काही तांत्रिक कारणांमुळे राहण्याची सोय केलेली नाही. येडेनिपाणी, कामेरी, तांदूळवाडी, मालेवाडी, कणेगाव, इटकरे, वशी, पेठ, नेर्ले, कासेगाव व परिसरातील गावातील कामगार वर्ग सध्या घरी असून जिल्हा बंदी असल्याने घरीच थांबा अशा सुचना कंपन्यांकडून अद्यापतरी देण्यात आल्याने सध्यातरी 'वेट अँड व्हाच करावे लागेल असे दिसत आहे. 

तालुक्‍यातील साधारण हजारच्या आसपास कामगार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, कागल, गोकूळ शिरगाव, इचलकरंजी येथे तर कराड तालुक्‍यातील कोयना वसाहत, तासवडे व ओगलेवाडी येथे एमआयडीसीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. मोटारसायकल, ट्रक व खासगी वाहनाने कामगार रोज येत-जात असतो यामध्ये काही प्रमाणात महिलाही आहेत. चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी कायम असल्याने अद्याप या समस्यांबाबत कोणाही सूचना दिलेल्या नाहीत. कामावर काहींनी जाण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्ह्याच्या सीमेवर प्रशासन यंत्रणेने त्यांना जाण्यास मनाई केली. वाळवा तालुक्‍यापासून कोल्हापूर व कराड पासून अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. 

दरम्यान; कामगार पगारबाबत माहिती घेतली असता मुळवेतनावरील 25% ते 75% पर्यंत व काही मोजक्‍याच कंपनीने पूर्ण पगार दिलेत तर काहींनी बेसिक पगार दिलाय. कंत्राटी कामगारांच्या बाबतीत बघितले असता त्यांच्यामध्ये 'कही ख़ुशी, कही गम' अशी स्थिती आहे. कोरोनामुळे उद्योग व्यवसाय अडचणीत येत असल्याने भविष्यात कामगार कपात होते का कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांमध्ये भिती निर्माण झाली आहे. तत्पूर्वी; एमआयडीसीमध्ये परप्रांतीय कामगार परतल्याने भविष्यात स्थानिक कामगारांना संधी मिळणार असल्याचे शक्‍यता असली तरी सध्या तरी त्याला वेळ लागेल. 

मोठ्या बेकारीचा धोका 
कामगार रोज कंपनीत फोन करून कामाबाबत विचारात आहेत. मात्र, कोणतीच सूचना त्यांना आलेली नाही. भविष्यात कामगार कपात झाल्यास मोठी बेकारी निर्माण होण्याची शक्‍यता नाकारत येत नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com