"आर्यन शुगर'मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घातले लक्ष 

"आर्यन शुगर'मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घातले लक्ष 

"आर्यन शुगर'मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घातले लक्ष 
सोलापूर : बार्शी तालुक्‍यातील आर्यन शुगरकडे प्रलंबित असलेले पैसे संबंधितांना तत्काळ मिळावेत, न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांवर शासनाच्या वतीने पाठपुरावा करावा यासह आर्यन शुगरच्या माहितीचा सविस्तर अहवाल राज्याच्या सहकार विभागाला पाठविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिली. वर्षानुवर्षे कोट्यावधीचे कर्ज व शेतकऱ्यांचे देणे थकित असलेल्या आर्यन शुगरच्या विषयात आता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लक्ष घातले आहे. 
हेही वाचा : शंकर कारखान्याच्या एफआरपीसाठी साखर आयुक्तांचे पत्र 
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात ढकलणाऱ्या बिगरशेती कर्जदारांपैकी आर्यन शुगर हा एक महत्वाचा कर्जदार आहे. माजीमंत्री दिलीप सोपल यांच्या नातेवाईकांचा हा कारखाना आहे. विजय शुगर आणि आर्यन शुगर या बड्या थकबाकीदारांमुळे डीसीसी बॅंकेचा एनपीए 42 टक्‍क्‍यांवर गेला आहे. विजय शुगरचा लिलाव करून जिल्हा बॅंकेने थकित रक्कम वसूल केली आहे. आर्यन शुगरच्या बाबतीत मात्र अद्यापही प्रभावी तोडगा काढण्यास बॅंकेच्या प्रशासकांना अपयश आले आहे. या कारखान्याकडील थकित रक्कम वसूल झाल्यास सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला पुन्हा एकदा उर्जितावस्था मिळेल अशी अपेक्षा आहे. 
हेही वाचा : कोल्हापूर झेडपीतील कॉंग्रेसच्या यशाचे हे आहे सुत्र 
आर्यन शुगरने पाच एकर जमिनीवर कारखान्याचा परवाना आणि जिल्हा बॅंकेचे 120 कोटी रुपयांचे कर्ज मिळविले कसे, कारखान्याला परवाना देणाऱ्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांवर आणि कर्ज देणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या मागणीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते. आर्यन शुगर हा खासगी साखर कारखाना कुमदा उद्योग समूहाकडे 500 रुपयांच्या स्टॅम्पवर हस्तांतरित करण्यात आला आहे. या व्यवहारात कारखान्याने लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क चुकविले असल्याचे देशमुख यांनी निदर्शनास आणले आहे. मुद्रांक शुल्काबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com