कोल्हापूर झेडपीतील कॉग्रेसच्या यशाचे 'हे' आहे सुत्र..

Kolhapur ZP Congress Formula Kolhapur Marathi News
Kolhapur ZP Congress Formula Kolhapur Marathi News

कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी जिल्ह्याच्या नेत्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनीच आपली ताकद लावली. काही जिल्हा परिषद सदस्य व महिला सदस्यांच्या पतींनी महत्त्वाची भूमिका घेतल्यानेच महाविकास आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला, तर भाजप आघाडीच्या काही सदस्यांनीही ताकदीने प्रयत्न केले. मात्र, सत्ता आणण्यात त्यांना यश आले नाही.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ता बदलासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी मोठी आघाडी घेतली. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे पक्षप्रतोद उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील, अपक्ष सदस्या रसिका पाटील यांचे पती अमर पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहिली. विविध आघाडीतील सदस्यांशी चर्चा करणे, विरोधी आघाडीतील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून या सदस्यांनी नेत्यांना योग्य तो संदेश वेळोवेळी पोचवला. तसेच नेत्यांनाही त्यांची स्ट्रॅटेजी बदलण्यास भाग पाडलेकाँग्रेसचे सुभाष सातपुते हे समाजकल्याण सभापती पदासाठी दावेदार होते. सर्वाधिक सदस्यांचा संपर्क असलेले सदस्य म्हणून सातपुते यांची ओळख आहे.

 
राजेश पाटीलांची भूमिका महत्वाची
मात्र, महाविकास आघाडीची सत्ता आली तरी पद मिळण्याची शक्‍यता नसल्याची त्यांना कल्पना आली. मात्र, त्यांनी पदापेक्षा सत्तेला महत्व देत संदेशाची देवाणघेवाण केलीस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांचे पती राजेश पाटील सर्वाधिक चर्चेत राहिले. पाटील हे महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे समर्थक आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते भाजपसोबतच राहतील, असे वातावरण  तयार केले होते. मात्र, पाटील यांनी संघटनेशी बेईमानी करणार नाही, असे घोषित करत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांना शिवसेनेच्या डॉ. सुजित मिणचेकर गटाचे सदस्य प्रवीण यादव यांनी चांगली 
साथ दिली.

बोरगे यांनी पक्षनिष्ठा दाखवली
राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदाच जिल्हा परिषद गाठलेल्या पैलवान विजय बोरगे यांनी पहिल्या अध्यक्षपदाच्या निवडीत गैरहजर राहत सर्वांनाच धक्‍का दिला. मानसिंगराव गायकवाड गटाचे बोरगे कोणत्या आमिषाला बळी पडले, याची चर्चा झाली. सुरुवातीचे अनेक महिने बोरगे हे संशयाचे धनी झाले. फुटीर सदस्य म्हणून त्यांच्यावर शिक्‍का बसला. अनेक महिन्यांनी बोरगे हे व्यक्‍तीगत स्वार्थासाठी नव्हे, तर गायकवाड कारखान्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्यांना अनुपस्थित राहण्याच्या सूचना दिल्याचे स्पष्ट झाले. यावेळीही बोरगे अनुपस्थित राहतील किंवा भाजपकडून मतदान करतील, यासाठी प्रयत्न करण्यात आले. आघाडीचे सदस्यही बोरगे यांच्याकडे संशयाने पाहत होते. मात्र, बोरगे यांनी पक्षासोबत राहत आपली पक्षनिष्ठा सिद्ध केली.

हेही वाचा - खानापूरातील काेंबडया का झाल्या भुर्रर्र...?? 
आवाडे, निंबाळकर यांची धावपळ
महाविकास आघाडीचे सदस्य उत्साहाने जोडण्या लावत असताना भाजपच्या पातळीवर शांतता होती. मोठमोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनात बैठकी सुरू असल्याने अनेक सदस्यांनी यात भागच घेतला नाही. मात्र, राहूल आवाडे, राजवर्धन निंबाळकर व अंबरिष घाटगे, राजू मगदूम यांनी सदस्यांशी संपर्क साधत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला. नेत्यांनी त्यांना थोडी जरी साथ दिली असती तर मताधिक्‍य घटवण्यात त्यांना यश आले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com