"घाबरू नका! चिकनमुळे कोरोना होत नाही"

does not cause corona Eating chicken
does not cause corona Eating chicken
Updated on

बेळगाव : कोरोनामुळे चिकन आणि अंडी खाऊ नयेत, अशी अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली आहे. पोल्ट्री व्यवसाय संपविण्यासाठी ही अफवा जाणीवपूर्वक पसरविण्यात आली आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, कोरोना व्हायरस आणि कोंबडीचा काहीही संबध नसून लोकांनी घाबरु नये, असे आवाहन कर्नाटक को-ऑपरेटीव्ह पोल्ट्री फेडरेशनच्या विभागीय प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. अनंत पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना केले आहे. 

कोरोना व्हायरसची लागण केवळ माणसाला होते. तो बर्ड फ्लूसारखा जनावरापासून माणसाला लागण होणारा आजार नाही. गेल्या दहा वर्षापासून भारतातील पोल्ट्री व्यवसायावर अनेकवेळा अशा प्रकारचे हल्ले सुरु आहेत. पोल्ट्री व्यवसाय दरवर्षी 8 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. भारताने अंडी उत्पादनात तिसरा तर ब्रॉयलर कोंबडी उत्पादनात जगात चौथे स्थान गाठले आहे. 2030 पर्यंत भारत अंडी आणि ब्रॉयलर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाने वर्षातून किमान 180 अंडी आणि 11.5 किलो चिकन खाले पाहिजे. शरीराला एवढ्या न्युर्टीशनची (पोषक मुल्ये) गरज असते. मात्र, काहीजण सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून पोल्ट्री व्यवसायाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चिकनसंदर्भात कोरोना व्हायरचा चुकीचा संदेश परविण्यात आला आहे. चिकन खाल्यामुळे मानसाला कोरोनाची लागण झाल्याच्या एकाही घटनेची नोंद जगभरात अद्यापर्यंत कोठेही झालेले नाही. त्यामुळे हे स्पष्ट झाले असून केवळ पोर्ल्टी व्यवसायात गुंतलेल्या भारतीय शेतकऱ्यांना संपविण्यासाठी ही अफवा पसरविण्यात आलेली आहे. बॉयलर कोंबडी मोठी होण्यासाठी 40 दिवसाचा कालावधी लागतो. (दोन किलो होईपर्यंत) त्यांना दिले जाणाऱ्या खाद्यावर हे अवलंबून असते. त्यांचे मुख्य खाद्य म्हणजे मका आहे. ते प्रति किलो 12 रुपये होते. तो दर आता 25 रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी कुक्‍कुटपालन व्यवसायावर अवलंबून आहेत. पूर्ण पणेवाढ झालेल्या कोंबडीची उत्पादन किमत 75 रुपये आहे. मात्र, अफवामुळे कोंबड्यांची किमत कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संगोपनाचा खर्च परवडणारा नसल्याने पोर्ल्टी व्यवसायीकांकडून कोंबड्याना मारणे किंवा फुकटात विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे. डॉ. पाटील म्हणाले कोणत्याही विषाणूवर उपचार केले जाऊ शकत नाहीत. पण, त्याचा जिवघेणा धोका औषधामुळे कमी केला जाऊ शकतो. यासाठी आपली रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढवावी लागते. अंडी, चिकनच्या माध्यमातून आपल्याला पुरेसे न्युर्टीशन (पोषक मुल्ले) जी आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवितात. त्यामुळे अंडी आणि चिकन खाल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते रोग नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com