esakal | आंबेडकर अनुयायी सुखलोलूप तर नेते दुकानदारीत मश्गूल : आठवले
sakal

बोलून बातमी शोधा

Indira Athawale

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत डाॅ. आठवले बाेलत हाेत्या. 

आंबेडकर अनुयायी सुखलोलूप तर नेते दुकानदारीत मश्गूल : आठवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः आंबेडकर अनुयायी आता सुखलोलूप झाले आहेत, तर नेते दुकानदारी करण्यात मश्‍गुल झाले आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाही, तर सर्वसामान्य माणसांचे दुःख आणि प्रश्नांचाच केवळ विचार करत त्यांनी चळवळीसाठी आयुष्य झोकून दिले. त्यांचे समाजाने सतत ऋणी असले पाहिजे, असे मत आंबेडकर चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासक नाशिकच्या डॉ. इंदिरा आठवले- वाघ यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी ई- सकाळचे ऍप डाऊनलाेड करा
 
येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत "कर्मवीर गायकवाड यांचे आंबेडकर चळवळीतील योगदान' या विषयांवर डॉ. आठवले बोलत होत्या. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, विश्वस्त रमेश इंजे व प्राचार्य डॉ. संजय कांबळे उपस्थित होते.

जरुर वाचा - आता पुढची धाव पुण्यात !

डॉ. आठवले यांनी कर्मवीर गायकवाड यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, ""कर्मवीर गायकवाड हे सच्चे भीमसैनिक होते. डॉ. आंबेडकर आणि दादासाहेब म्हणजे गुरू- शिष्याची उत्तम दर्जाची जोडी होती. बाबासाहेब चळवळीची वैचारिक सैधांतिक बाजू सांभाळत असताना प्रत्यक्ष जमिनीवरील दीर्घकाळाच्या काळाराम मंदिर सत्याग्रहासारख्या लढाईची जबाबदारी दादासाहेबांनीच समर्थपणे सांभाळलेली. बाबासाहेबांच्या हयातीनंतर दादासाहेबांनी भूमिहीनांचा लढा उभारला.

हेही वाचा - पोलिस झाडावर लपून बसतात तेव्हां... 

मानवी हक्काच्या या आदर्श लढ्यांच्या झंजावाताने महाराष्ट्र हादरवून टाकला होता. त्यामध्ये स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. सर्व समाजातील भूमिहीनांसाठी उभारलेला हा लढा यशस्वी झाला असता तर संपूर्ण देशाचे चित्र बदलले गेले असते. कसेल त्यांची जमीन; पण जमीन नसेल त्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी त्या वेळी लावून धरला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. तर्कशुद्ध विचार करणे हे त्यांचे वैशिट्य होते. त्यांचे चळवळीतील मोठेपणाचे स्थान लोकांसमोर आणण्याची नितांत गरज आहे.''

अवश्य वाचा - ताई तू घाबरु नकाेस आम्ही आहाेत 
 
प्राचार्य संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रमेश इंजे यांनी स्वागत केले. डॉ. गुलाब वाघ यांचा सत्कार प्रा. होवाळे यांनी केला. कार्यक्रमास कोल्हापूरचे डॉ. शामकांत तेलवेकर, कृष्णाजी इंजे, ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image