esakal | "ताई' तू घाबरु नकाेस आम्ही आहाेत
sakal

बोलून बातमी शोधा

Superintendent Of Police Satara Tejaswi Satpute

एखाद्या पिडीत महिलेले मदत देण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाेहचण्यासाठी यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

"ताई' तू घाबरु नकाेस आम्ही आहाेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा - "ताई' संकटात आहात, तर तातडीने डायल करा 1091. 
हा टोल फ्री क्रमांक पोलिसांचा असून, तुम्हाला तातडीने मदत मिळू शकेल. वर्षभरात या टोल फ्री क्रमांकावर दहा तक्रारी दाखल झाल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई - सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

हैदराबाद येथील दिशा यांच्यावरील अत्याचार आणि अमानुष खुनानंतर देशभरात महिलांवरील अत्याचाराविरुद्ध तत्काळ दाद मागण्याच्या यंत्रणेविषयी चर्चा सुरू झाली आहे. एकाने "दिशाने बहिणीऐवजी पोलिसांना फोन केला असता तर ती वाचली असती', असे वादग्रस्त विधानही केले. त्या पार्श्‍वभूमीवर महिलांवर अत्याचार होत असल्यास त्यांच्यासाठी असलेल्या 1091 टोल फ्री क्रमांकावरील तक्रारींची माहिती घेतली असता, वर्षभरात दहा तक्रारी झाल्याचे समोर आले.

अवश्य वाचा -  पोलिस झाडावर लपून बसतात तेव्हां...  

महिलांनी मोबाईलमध्ये 1091 हा टोल फ्री क्रमांक जतन करावा, यासाठी पोलिसांनी वेळोवेळी आवाहन केले आहे. संकटप्रसंगी तत्काळ मदत उभी करण्यासाठी पोलिसांच्या गस्ती पथकांसह विशेष निर्भया पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कार्यरत असतात. शिवाय, महाविद्यालय, शाळांमध्ये छेडछाड विरोधी पथके तयार करण्यात आली आहेत.

हेही वाचा - एसपीं मुळेच आम्ही करुन दाखवलं : पाेलिसांची भावना 
 
महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य पोलिस दलातर्फे महिलांसाठी 1091 ही हेल्पलाइन सुरू केली आहे. 2019 मध्ये आजअखेर दहा तक्रारी या हेल्पलाइनवर प्राप्त झाल्याची माहिती पोलिस मुख्यालयातून देण्यात आली.
 
तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली आहे. महिलांना मारहाण, छळाबाबतच्या तक्रारींचा यात जास्त समावेश आहे. त्यात शहरातील आलेल्या तक्रारींची संख्या जास्त आहे. येथे 24 तास दोन-दोन महिला पोलिस कार्यरत असतात. महिलांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या महिला पोलिसांकडून त्यांची नोंद घेतली जाते. संबंधित पोलिस ठाण्याला त्याची माहिती देवून तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाठविले जाते. त्याबाबत काय कार्यवाही झाली, याची पडताळणीही केली जाते. सर्वाधिक तक्रारी मारहाण करून छळ केल्याच्या आहेत. ग्रामीण महिलांमध्ये हेल्पलाइनबाबत जागृती होणे आवश्‍यक आहे. 

शालेय मुलींचीही तक्रार 

सडकसख्याहरींचे प्रमाण सर्वदूर पसरले आहे. त्याचा त्रास केवळ महाविद्यालयीनच नव्हे तर माध्यमिक शाळांतील मुलींनासुध्दा होत असतो. आजच या हेल्पलाइनवर एका शाळेतील मुलीने शाळेत येता- जाताना त्रास देणाऱ्या मुलांबाबत तक्रार केली. एका हॉस्पिटलमधील कर्मचारी तीन वर्षांपासून त्रास देत असल्याची तक्रार एका तरुणीने केली होती. सासू, 
सासरे मारहाण करतात, अशाही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

हेही वाचा - पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार 


""मुली, महिलांनी 1091 हा हेल्पलाइन क्रमांक मोबाइलमध्ये अत्यावश्‍यक म्हणूनच जतन करावा. अडचणीच्या प्रसंगी, अन्याय होत असल्यास यावर पोलिसांशी संपर्क साधावा. लवकरच निर्भया पथकेही नव्याने कार्यरत करणार आहे.'' 
तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सातारा.

loading image
go to top