पोलिस झाडावर लपून बसतात तेव्हां...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

सातारा शहर व तालुक्‍यात पोलिसांनी सध्या अवैध व्यवसायांवर छापा टाकण्यास प्रारंभ केला आहे. या कारवाईतून सुमारे 57 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सातारा : मुंबई परिसरात फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या संशयितास तालुका पोलिसांनी पकडून वाणगाव (जि. पालघर) पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सचिन रामचंद्र साळुंखे (रा. कारंडवाडी, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई- सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

त्याच्यावर वाणगाव, भोईसर, श्रीवर्धन, नवघर या पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो साताऱ्यात येणार असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार व सयाजी काळभोर यांना त्याला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हे पथक त्या पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते.

पळून जाण्याच्या तयारीत अन्... 

पोलिसांची चाहूल लागल्यानंतर तो पळून जाण्याच्या तयारीत होता; परंतु त्याच्या घराच्या पाठीमागील झाडावर लपून बसलेल्या पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरीक्षक व पथकातील सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 

हेही वाचा - एसपीं मुळेच आम्ही करुन दाखवलं : पाेलिसांची भावना 
 

जुगारप्रकरणी पाच छाप्यांत 57 हजारांचा ऐवज जप्त
 

सातारा शहर व तालुक्‍यात पोलिसांनी पाच ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम जुगाराचे साहित्य असा 57 हजार 762 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 
साईबाबा मंदिराच्या समोर पत्राच्या शेडच्या आडोशाला मटका घेताना विशाल ऊर्फ शैलेश उत्तम बडेकर (वय 24, रा. मल्हार पेठ) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून तीन हजार 885 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

कोडोली (ता. सातारा) येथील कमानीच्या बाजूला तनवीर ऊर्फ सद्दाम इक्‍बाल शेख (वय 27, रा. गुरुवार पेठ) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 42 हजार 115 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

अवश्य वाचा - पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार 

ढेबेवाडी (ता. पाटण) येथील सरिता बाजारसमोर श्रीरंग बापू जाधव (रा. नडशी, ता. कऱ्हाड) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून 435 रुपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले.

कऱ्हाड येथे विजय दिवस चौक येथील खाजा खजीर दर्गाशसमोर सागर विलास ढवळे (वय 58, रा. रुक्‍मिणीनगर मंगळवार पेठ, कऱ्हाड) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून 492 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंचा झाला इतका खर्च

वाई येथे पीआर चौकात सुरूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पान टपरीच्या आडोशाला संजय तुळशीराम खरात (रा. साकेवाडी, ता. वाई) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून एक हजार 835 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Have Started Raiding Illegal Businesses in Satara city