"प्रदूषणाचा भस्मासूर', "वनकन्या'ची बाजी

Drama compition in kolhapur
Drama compition in kolhapur

कोल्हापूर ः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इकोफोक्‍स व्हेंचर्स आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपर बालनाट्य स्पर्धेत शहरी विभागात बालाजी माध्यमिक विद्यालय इचलकरंजीच्या "प्रदूषणाचा भस्मासूर' आणि ग्रामीण विभागात बाचणीच्या ज्ञान प्रबोधिनी इंग्लीश मीडियम स्कूलच्या "वनकन्या' नाटकांनी प्रथम क्रमांक मिळवला. 

विजेत्या नाटकांचा पारितोषिक वितरण समारंभ परेश पिंपळे, संजय जोग, अथर्व जोशी, केतकी जमदग्नी, श्रेयस मोहिते यांच्या हस्ते झाला. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात स्पर्धा झाली. स्पर्धांमध्ये ग्रामीण आणि शहरी विभागातून एकूण 24 शाळांनी सहभाग घेतला होता. शहरी विभागात सांघिक प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक वि. स. खांडेकर प्रशालेच्या "बजरंगपूरचा बजरंगी राजा' तर तृतीय क्रमांक राणी सरस्वती देवी कन्या शाळा सांगलीने केलेल्या "कृती करताना ठेवू भान, पर्यावरण होईल सुंदर छान' या नाटकांनी पटकावले. उत्तेजनार्थ म.ल.ग. हायस्कूलच्या "झूल मंजुळेची' या नाटकाला मिळाला. 
ग्रामीण विभागात गिजवणे हायस्कूलच्या "हिरवी बाभळ'ला दुसरा तर भैरवनाथ माध्यमिक विद्यालय भुयेवाडीच्या "अस्त एका साम्राज्ञीचा' या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला. माध्यमिक विद्यालय पाचगावच्या "गॅझेट'ला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. 
परीक्षक म्हणून संजय जोग आणि अथर्व जोशी यांनी काम पाहिले. संयोजन पुष्कर बोरगावकर, आम्रपाली क्षीरसागर, नाना बोरगावकर, प्रशांत जोशी यांनी केले. 

इतर बक्षिसे 

शहरी विभाग : दिग्दर्शन प्रथम : एम.एस. रावळ, द्वितीय : डी.के. रायकर, तृतीय : वंदना हुळबते, उत्तेजनार्थ : विशाखा जितकर 
लेखन प्रथम : एन.डी. चौगुले, द्वितीय : प्रीती जोशी, तृतीय : विशाखा जितकर, उत्तेजनार्थ : गजानन पाटील 
अभिनय : प्रतिक हुंदरे, ओंकार कोकाटे, कनिष्क शिंदे, विपुल भंडारे, प्राजक्ता पवार,, श्रृती जाधव 
ग्रामीण विभाग 
दिग्दर्शन : प्रथम : शोभा पाटील, द्वितीय : शिवाजी पाटील, तृतीय : वैशाली आमाणावर, उत्तेजनार्थ : मिलिंद कोपार्डेकर 
लेखन : प्रथम सारीका पाटील, द्वितीय : विद्याधर चौगुले, तृतीय : मिलिंद कोपार्डेकर, उत्तेजनार्थ : संजय मगदूम 
अभिनय : निरज चौगुले, स्वरुप पाटील, जयदिप कुंभार, विनायक कुलकर्णी, पृथ्वी पाटील, समृद्धी नलवडे, स्नेहा सावंत, भक्ती पोवार. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com