कोल्हापुरात उद्योजकाची तणावातून आत्महत्या 

Due To Stress Entrepreneur Suicide In Kolhapur
Due To Stress Entrepreneur Suicide In Kolhapur

कोल्हापूर - राजेंद्रनगरात राहत्या घरी उद्योजकाने पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र शरदचंद्र कुऱ्हाडे (वय 55) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांनी दिलेली माहिती, जितेंद्र कुऱ्हाडे यांनी उद्योग क्षेत्रात आपली चांगली ओळख निर्माण केली होती. गोकुळ शिरगाव एमआयडीसीत त्यांचे दोन कारखाने आहेत; पण सध्या सर्वच व्यवसायात मंदीचे सावट आहेत. त्यामुळे कुऱ्हाडेही तणावात होते. त्यांची मुलगी पुण्यात शिक्षण घेते. तिला भेटण्यासाठी त्यांची पत्नी व मुलगा पुण्याला गेले होते. घरात ते आई, भाऊ व त्यांचे कुटुंबीय होते. आज दुपारी ते घरी आले. जेवण करून ते झोपण्यासाठी वरच्या मजल्यावरील खोलीत गेले.

गळफास घेऊन आत्महत्या

सायंकाळी ते भावासोबत एका बैठकीसाठी जाणार होते; पण सायंकाळी साडेपाच वाजले तरी ते खाली आले नाहीत. त्यामुळे त्यांचे भाऊ त्यांना पाहण्यासाठी वरच्या खोलीत गेले. त्या वेळी त्यांना कुऱ्हाडे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती घरच्यांना दिली. त्यांनी राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला. कुऱ्हाडे यांनी तणावात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आली आहे. ते नेमके कोणत्या तणावात होते. याची माहिती घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com