Killemachindragad News : राजकीय नेत्यांच्या ईच्छाशक्तिअभावी क्षारपड जमीन सुधारणा राहिली कागदावरच

राज्यातील वाढत्या राजकीय संघर्षाचा परीणाम आणि राजकिय नेत्यांनी ग्रामीण विकासाकडे केलेले दुर्लक्ष ग्रामीण विकासाच्या योजना कागदावर राहून तालुक्यातील ग्रामीण विकासाला खिळ बसली आहे.
Land
Landesakal

किल्लेमच्छिंद्रगड - राज्यातील वाढत्या राजकीय संघर्षाचा परीणाम आणि राजकिय नेत्यांनी ग्रामीण विकासाकडे केलेले दुर्लक्ष ग्रामीण विकासाच्या योजना कागदावर राहून तालुक्यातील ग्रामीण विकासाला खिळ बसली आहे. क्षारपड सुधारणेच्या कामी गती यावी यासाठी चार वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी एक योजना अस्तित्वात आणली आहे.

योजनेअंतर्गत क्षारपड जमीन सुधारणेच्या कामासाठी पाच कोटी रुपयापर्यंतच्या खर्चाची तरतूद आहे. तथापि योजना राबविण्याबाबत साखर चळवळीतील कार्यकर्त्यांची अनास्था आणि शेतकऱ्यांचे अज्ञान तालुक्यातील क्षारपड झालेल्या सुमारे १७५६१ हेक्टर जमीनी कायमस्वरूपी वाळवंट होण्याच्या मार्गावर आहेत.

सततच्या बागायत शेतीमुळे तालुक्यात असे एकही गाव नाही जिथे क्षारपड जमिनीचा प्रश्न निर्माण झालेला नाही. प्रत्येक गावाला क्षारपडीच्या संकटाने ग्रासले आहे. जमीन सुधारणेसाठी शासनाच्या जलसंपदा विभागाची योजना आहे. परंतु तालुक्यातील अशा पडीक जमिनीचा सर्व्हे करायचा कुणी आणि वेळ देवून प्रस्ताव तयार करून प्रश्न मार्गी लावायचा कुणी यासाठी कुणीच वाली भेटत नसल्याने राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे काय? असा प्रश्न निर्माण होतोय. सध्यातरी क्षारपड जमीन सुधारणांसाठी जाहीर झालेली योजनेची अवस्था म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा होऊन बसली आहे.

याकामी साखर कारखानदारांनी पुढाकार घ्यायला हवा. कारखान्याच्या तसेच इतर औद्योगिक संस्थांच्या माध्यमातून ते दहा टक्के निधी उभारू शकतात. शिवाय शेतकऱ्यांचा दहा टक्के निधी उस बिलातून कपात करून घेवू शकतात अथवा सोसायटीच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात निधी उभा करण्याच्या शेतकऱ्यांना सूचना करून शासनाचा एकूण प्रस्तावाच्या ऐशी टक्के निधी मिळवून शेतकऱ्यांना क्षापडीच्या संकटापासून वाचवू शकतात. तथापि कार्यकर्त्यांना नेत्यांचा उदोउदो करण्यात आणि नेत्यांना गेली साडेतीन वर्षे झाली राज्यात चाललेल्या राजकीय अस्थिरतेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे द्यायला वेळ नाही ही खरी शोकांतिका आहे.

याकारणाने योजना बारगळली

जमीन सुधारणा कामासाठी ऐंशी टक्के निधी शासनाचा, दहा टक्के निधी लाभार्थी शेतकऱ्याचा तर उर्वरित दहा टक्के निधी कारखाने, औद्योगिक संस्थाच्या सामाजीक दायीत्वाच्या (CSR) निधीतून उभारावयाचा असे एकंदरीत योजनेचे स्वरूप आहे. तथापि योजना राबविण्याबाबत तथाकथीत नेतेमंडळींचा निरुत्साह आणि शेतकऱ्यांचे योजनेविषयीचे अज्ञान योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीत अडसर ठरल्याने योजना कागदावरच राहून गेली आहे.

वाळवा तालुक्यातील जमीन क्षेत्र:

  • तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र: ८०५३० हेक्टर

  • पिकाखालील क्षेत्र: ६९५६१ हेक्टर

  • पेरणीलायक क्षेत्र: ६१२३८ हेक्टर

  • बागायत क्षेत्र: ४८९६० हेक्टर

  • जिराईत क्षेत्र: ८५४० हेक्टर

  • पीक क्षेत्राखालील क्षारपड क्षेत्र: ४३३२ हेक्टर (३९) गावे

  • अंशत: क्षारपड क्षेत्र: १३२२९ (४८ गावे)

  • तालुक्यातील एकूण क्षारपड क्षेत्र: १७५६१ हेक्टर (८७ गावे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com