माळशिरसमध्ये 'राम' आला; ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला आमदार | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

Election Results 2019 : मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघामध्ये शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते यांनी अखेर 2702 मताधिक्यांनी विजय मिळवला आहे.

माळशिरस : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंच्या गळ्यात अखेर विजयाची माळ पडली. मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते यांनी अखेर 2702 मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी ओळख सातपुतेंनी काही दिवसांतच मिळवली होती.

- सातारा : साताऱ्यात पवारच जनतेचे राजे! Election Result 2019

माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, त्याला टक्कर देत भांबुर्डी या दुष्काळी गावातील एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला भाजपने आमदारकीचे तिकीट दिले. आणि सध्याच्या राजकीय घराणेशाहीला बाजूला सारलं. 

- सोलापूर: पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी शिकवला धडा | Election Results 2019

पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीचे उत्तम जानकर हे आघाडीवर होते. त्यानंतर तेराव्या फेरीनंतर जानकरांकडे असलेली आघाडी हळूहळू कमी होत गेली. 19 व्या फेरीपर्यंत जवळपास जानकर आणि सातपुतेंमधील मतांमध्ये बरोबरी झाली. त्यानंतर 22 व्या फेरीनंतर राम सातपुते यांनी 856 मतांनी आघाडी कायम ठेवत उत्तम जानकर यांच्यावर मात केली. राम सातपुते यांच्या भरघोष विजयानंतर माळशिरसमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

- सोलापूर : बार्शीत रोलरला बाजूला करत ट्रॅक्टरची बाणावर मात; सोपलांचा पराभव | Election Results

माळशिरस तालुक्यातील भांबुर्डीची कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचे लहानपण गेले आणि त्यातच सातपुते यांच्या घरची परिस्थितीही बिकट होती. त्यांचे वडील ऊस तोडणीचे काम करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019 Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Solapur trends evevning