मोतीराम वाघ.... पर्यावरण रक्षणासाठी झटणारा अकलूजचा अवलिया

शशिकांत कडबाणे 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- अकलूज ते कन्याकुमारीची सफर 
- दुचाकीवरून दक्षिण भारत भ्रमंती 
- नऊ दिवसात कापले तीन हजार 200 किलोमीटर अंतर 
- मुलगाही झाला अभियानास सहभागी

अकलूज (जि. सोलापूर) : बागेचीवाडी - अकलूज (ता. माळशिरस) येथील शेतकरी मोतीराम वाघ यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावा, असा संदेश देत अकलूज ते कन्याकुमारी व परत अकलूज असा प्रवास दुचाकीवर पूर्ण करीत दक्षिण भारतात भ्रमंती केली. 
रोज सकाळी लवकर उठून दुचाकी चालू करायची आणि भ्रमंती सुरू करायची, वाटेत भेटणाऱ्या गावोगावातील लोकांना पर्यावरणाच्या समतोलासाठी, आपल्या पुढील पिढीसाठी एक तरी झाड लावा, असा आग्रह करून पुढील प्रवासाला निघायच. रात्र झाली की जिथे असेल तेथेच मुक्काम करायचा, दिवस उजाडला की पुन्हा भ्रमंती सुरु, असा तब्बल नऊ दिवस रोज सुमारे 400 किमीचा प्रवास करत संपूर्ण दक्षिण भारत भ्रमंती करुन आलेले शेतकरी मोतीराम वाघ आपल्या प्रवासातील रोचक अनूभव सांगत होते. 

पंढरपूर ः थंडीमुळे विठुरायाच्या अंगावर शाल आणि रजई

मोतीराम वाघ यांनी आपल्या या आभियानात पुढची पीढी म्हणजे स्वतःचा मुलगा समाधान यास सहभागी करून घेतले. दिवाळीची सुट्टी मामाच्या गावी जाण्यापेक्षा आपल्या वडीलांसोबत दक्षिण भारत फिरणे त्याला रोमांचकारी वाटले. प्रवासा दररम्यान तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आदी विविध राज्यातील बोली भाषा अनुभवत आपल्या मोडक्‍यातोडक्‍या हिंदी, इंग्रजीतून आपले म्हणणे पटवून देताना वेगळाच अनुभव घेता आल्याचे वाघ यांनी सांगितले. 

तर या महापालिकेस दरमहा दहा लाखांचा दंड

वाघ यांनी आपल्या अभियानास अकलूज येथून सुरवात करून सातारा, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, हुबळी, द्रावणागिरी, चित्रदुर्ग बेंगलोर, सैलम, तिरुपती, चेन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, कन्याकुमारी येथून परत त्रावेंदनम, ओलाम, येरणाकूलम, कोचीन, पालघर, कोईमतूर, म्हैसूर, उटी, बेंगरुल, कोल्हापूर, अकलूज असा सुमारे तीन हजार 200 किमी प्रवास केला. आपल्या भ्रमंतीमुळे त्या भागाची भौगोलिक, सांस्कृतिक, प्रथा परंपरा आदींची माहिती मिळते व त्याचा आपणाला आनंद मिळत असल्याचे वाघ यांनी सांगितले. या प्रवासात त्यांनी झाडे लावा झाडे जगवा, असा पर्यावरण संतुलाचा संदेश दिला. 

पर्यटनासह देवदर्शनासाठी सटीचे पॅकेज 

सायकलवरून केले भारत भ्रमण 
यापूर्वीही मोतीराम वाघ यांनी सायकलवरून संपूर्ण भारतभ्रमण केले होते. त्यांनी 1990 साली काश्‍मीर ते कन्याकुमारी असा सुमारे 1100 किलोमीटरचा प्रवास 95 दिवसात सायकलने केला होता. आजही वयाच्या 56 वर्षी ते सायकलने भारत भ्रमण करण्यास तयार होते. परंतु वेळेअभावी त्यांनी दुचाकीचा पर्याय निवडला. आपल्या भ्रमंती करण्याच्या छंदाचा सामाजिक फायदा होईल, याचा विचार करून भविष्यात आपण वेगळे अभियान राबविणार असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले. 
महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environment awareness campaign by motiram wagh