फुटलेल्या पाईपात अडकलेल्या गायीची सुटका

फुटलेल्या पाईपात अडकलेल्या गायीची सुटका
Updated on

मानेगांव : मानेगाव ते वाकाव रस्त्यावर असलेल्या पुलाच्या फुटलेल्या पाईपात पाय घसरून गाय अडकली. केविलवाण्या आवाजात हंबरडा फोडणाऱ्या या गायीचा जीव अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गावकऱ्यांनी वाचवला. या रस्त्यावरील नादुरुस्त पुलामुळे मृत्यूस निमंत्रण मिळत आहे.
 

हेही वाचा -

पोपट बेडगे हा शेतकरी गाय घेऊन जात असताना पाय घसरून गाय पुलाच्या फुटलेल्या पाईपसदृश नळीत पडली. जीव वाचवण्यासाठी ती मोठ्याने हंबरडा फोडू लागली. मात्र गायीला सहजासहजी काढणे शक्‍य नव्हते. बेडगे यांनी अन्य शेतकऱ्यांना फोन केले, सगळ्यांच्या प्रयत्नांनंतर गायीला बाहेर काढता आले.
 

हेही वाचा -

माढा तालुक्‍यातील मानेगांव ते वाकाव रस्त्यावरील धोकादायक पुल देतोय मृत्यूलाच आमंत्रण मात्र संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.वाकाववरून मानेगांवकडे येण्याजाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी दुध वाहतूक कांदा , ऊस वाहतूक याच मार्गावरून होत आहे .त्यामुळे मोठ्या मृत्यूच्या अपघाताला आमंत्रण देणारा रस्ता ठरत आहे . सध्या वाकाव येथील रहिवासी आ. तानाजीराव सावंत आहेत . गेल्या वीस वर्षात लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले नाही . आतातरी कोणी लक्ष देईल का असा प्रश्न मानेगांव व वाकाव येथील ग्रामस्थांना पडला आहे . अजुन काही घटना घडण्याची वाट संबंधित विभागाने न पाहता याकडे लक्ष देण्याची गरज आहे .
 

हेही वाचा -

मानेगांव ते वाकाव रस्त्याने आम्हाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी सतत दुर्लक्ष करत आहेत. आज गायीचा जीव जात होता, रात्रीच्यावेळी एखादा माणूस त्यात सापडला प्राण गमावण्याचीच वेळ त्याच्यावर येईल.
- दीपक देशमुख, गावकरी
 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
bribery case in Sangli district
Maharashtra Sugar Market
Marathi News Esakal
www.esakal.com