शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी संघटना’ मोठी झाली. तिला व्यापक स्वरूप आले. त्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे आणि सोडविण्याचे काम सुरू झाले.
Maharashtra Farmer Movements : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांना भिडून शेतकऱ्यांच्या तिजोरीत योग्य मोबदला देण्यापासून त्यांचे प्रश्न सरकारदरबारी सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या शेतकरी चळवळी निद्रावस्थेत झाल्याचे चित्र दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ज्या संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एक मोठा दबदबा तयार केला होता, ती संघटना सध्या शासकीय दरबारी पत्रके देऊन प्रश्न सोडविण्याची विनवणी करताना दिसत आहे.