काश्‍मीरमधील शेतकऱ्यांच्या भेटीनंतर राजू शेट्टी म्हणाले, 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 November 2019

उद्या शिष्टमंडळ केसर उत्पादकांची भेट घेण्यात येणार आहे. सफरचंद, आक्रोड व केसर उत्पादक अडचणीत आले आहेत. या सर्व उत्पादकांची व त्यांच्या नुकसानीची माहिती घेऊन राज्यपालांना भेटणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

कोल्हापूर - जम्मू-काश्‍मीर येथे होणारी बर्फवृष्टी आणि 370 कलमामुळे जनजीवन ठप्प आहे. सफरचंदाची झाडे मोडून पडली आहेत. तीच अवस्था आक्रोड आणि केसर उत्पादक शेतकऱ्यांची आहे. आज दिवसभर श्रीनगर येथील शेतकऱ्यांची भेट घेतली. उद्या पुलवामा येथे केशर उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी राज्यपालांना भेटून करणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे शिष्टमंडळ जम्मू-काश्‍मीर येथे गेले असून ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. 

झाडेच बर्फाखाली गेल्याने शेतकऱ्यांवर संकट

श्री. शेट्टी म्हणाले, ""काश्‍मीर येथे मोठी हिमवृष्टी होत आहे. त्यामध्ये सफरचंद व इतर फळपिकांची झाडे मोडून पडली आहेत. शेतकऱ्यांची अजून तरी कोणीही विचारपूस केलेली नाही. झाडेच बर्फाखाली गेल्याने शेतकऱ्यांवर संकट आले आहे. तर झाडाचे काढलेले सफरचंद नेण्यासाठी व्यापारी येत नसल्याने या सफरचंदाचे करायचे काय? असा प्रश्‍न पडला आहे. शिष्टमंडळाने दिवसभर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. इतक्‍या दिवसात पहिल्यांदाच कोणीतरी चौकशी करत असल्याबद्दल काश्‍मीरमधील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

शेट्टी केसर उत्पादकांनाही भेटणार

उद्या शिष्टमंडळ केसर उत्पादकांची भेट घेण्यात येणार आहे. सफरचंद, आक्रोड व केसर उत्पादक अडचणीत आले आहेत. या सर्व उत्पादकांची व त्यांच्या नुकसानीची माहिती घेऊन राज्यपालांना भेटणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 
शिष्टमंडळात व्ही. एम. सिंह, योगेंद्र यादव, प्रेमसिंह गेहलावत, कृष्णप्रसाद पद्मनाभन, पी. सत्यवान यांचा समावेश आहे. 

अर्थमंत्र्यांचे अर्थहीन वक्तव्य

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बाजार समित्या बरखास्त करण्याची गरज असे वक्तव्य केले आहे. यावर ट्विटरवरून माजी खासदार शेट्टी यांनी निशाना साधला आहे. अर्थमंत्र्यांचे अर्थहीन वक्तव्य असून बाजारसमित्या बरखास्त करून शेतकऱ्यांना अदानी, अंबानी आणि वाॅलमार्टचे गुलाम बनवता काय? असा सवाल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP Raju Shetti meet Kashmir Farmer