
पलूस : जमिनीच्या कब्जाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही महसूल विभागाने कब्जा देऊन अन्याय केल्याच्या कारणावरून प्रजासत्ताक दिनी सांडगेवाडी (ता. पलूस) येथील माजी सैनिक व कुटुंबाने तहसील कार्यालय आवारातच अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. आंदोलक कुटुंबाने महसूल व पोलिसांच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त करून निषेध केला.